ETV Bharat / state

Fake OSD in CM Office: 'या' ठाकरेनं मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणलं असतं, काय आहे प्रकरण? - Fake OSD

Fake OSD in CM Office: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मयूर ठाकरे नावाच्या व्यक्तीनं आठ महिने गंडा घातल्याचं निदर्शनास आलंय. मुख्यमंत्र्यांचा ओएसडी म्हणून एक तोतया वावरत होता. या संदर्भात मंत्रालय पोलिसांनी गंभीर दखल घेतलीय. तपास सुरू असल्याची माहिती दिलीय.

Fake OSD in CM Office
मयूर ठाकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 10:24 PM IST

Updated : Sep 7, 2023, 4:42 PM IST

अमरावती Fake OSD in CM Office : मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पुन्हा एकदा दिव्याखाली अंधार असल्याचं निदर्शनास आलंय. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये गेल्या आठ महिन्यांपासून एका मयूर ठाकरे नावाच्या व्यक्तीनं मुख्यमंत्र्यांना सराईतपणे गंडा घातलाय. मुख्यमंत्र्यांचा ओएसडी म्हणून गेल्या आठ महिन्यांपासून मंत्रालयात राजरोसरी वावरणाऱ्या या तोतयानं अनेक फाईली बिनदिक्कतपणे फिरवल्याचं समोर आलंय. मुख्यमंत्री कार्यालयात तोतया ओएसडी सापडल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडालीय. मयूर ठाकरे असं त्याचं नाव आहे.

मुख्यमंत्री कार्यालयात ठाकरे कोण? अचलपूर नगरपरिषदेच्या एका तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यानी तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओएसडी असल्याचं भासवलं. त्यानं मुख्यमंत्री कार्यालयाचं बनावट ओळखपत्र आणि बनावट नियुक्तीपत्र तयार केलं होतं. त्या पत्राच्या आणि ओळखपत्राच्या आधारे मंत्रालयात ओएसडी म्हणून काम केलं. विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यांपासून ही व्यक्ती मंत्रालयात वावरत असताना मयूर ठाकरे हा तोतया आहे, हे कोणाच्या लक्षातही आलं नाही हे विशेष. सर्व वरिष्ठ सनदी अधिकारी आणि अन्य विशेष कार्य अधिकाऱ्यांना तो चुना लावत हात होता. अनेक फायली फिरवत राहिला आणि त्यातून पैसा कमवत राहिला. (Fake OSD duped to Eknath Shinde)

ठाकरे याची चौकशी सुरू : मंत्रालयात सह्याद्रीवर एका बैठकीदरम्यान एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना मयूर ठाकरेचं वागणं संशयास्पद वाटलं. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याची उत्तरं समाधानकारक वाटली नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिलीय. त्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची असून चौकशी केलीय. त्यात तो बनावट असल्याचं उघडकीस आलंय. या संदर्भात अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती मंत्रालय पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय.

करवसुली निरीक्षक म्हणून कार्यरत : सध्या मंत्रालयात चर्चेचा विषय झालेला मयूर ठाकरे (Mayur Thackeray) हा अचलपूर नगरपालिकेत करवसुली निरीक्षक म्हणून कार्यरत होता. तसंच तो दिव्यांगांच्या कामाचा टेबल देखील सांभाळत होता. दिव्यांगांच्या हिताची अनेक कामं त्यानं अचलपूर नगरपालिकेत केलेत. शासनाच्या अनेक योजना दिव्यांगांना मिळवून देण्यासाठीचं काम मयूर ठाकरेनी केलं, त्यामुळं बच्चू कडू यांच्यासोबत त्याची चांगलीच ओळख झाली होती. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर बच्चू कडू हे राज्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी मयूर ठाकरेला आधी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात डेप्यूटेशनवर नेमलं. त्यानंतर त्याला थेट आपला ओएसडी म्हणून मंत्रालयात नेलं. तिथं मयूर ठाकरे हा दिव्यांगांसाठी काम करीत होता.

  • मे महिन्यापासून त्याचं वेतन बंद : अचलपूर नगरपालिकेचा मूळ कर्मचारी असणाऱ्या मयूर ठाकरे याचं अचलपूर नगरपालिकेनं वेतन दिलं नाही, असं अचलपूरचे मुख्याधिकारी धीरज गुहाळ यांनी स्पष्ट केलंय. अचलपूर नगरपालिकेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत झाल्यानंतर माझ्या कार्यकाळात मयूर ठाकरेचं वेतन केलं नाही, असं धीरज गोहाड यांनी स्पष्ट केलंय.

वशिल्याने मंत्रालयात काम मिळविले : आमदार बच्चू कडू म्हणाले, मयूर ठाकरे हा माझ्यासोबत ओएसडी म्हणून होता. आता नऊ महिन्यापूर्वी सरकार बदलल्यावर मयूर ठाकरेशी माझा कुठलाही संबंध आलेला नाही. मयूरने कोणाच्यातरी वशिल्याने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे ओएसडी म्हणून काम मिळवल्याची माहिती होती. आता त्याने जो काही प्रकार केल्याचे बोललं जात आहे, त्या संदर्भात मला देखील कुठलीच माहिती नाही, असं अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केलंय. (duped to Eknath Shinde)

हेही वाचा :

  1. Pune Crime news: कर्नाटक येथील तोतया मेजरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; युनिफॉर्मसह कागदपत्रेदेखील तयार केले बनावट
  2. Pune Crime : फक्त प्रसिद्धीसाठी तोतया IAS अधिकारी जायचा विविध कार्यक्रमांना; जाणून घ्या काय आहे प्रकरण
  3. Mumbai Fraud News: पानटपरीतून फुकटेगिरी करणारा तोतया पोलीस गजाआड, 'त्या' एका चुकीमुळे पोलिसांना आला होता संशय

Last Updated : Sep 7, 2023, 4:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.