अमरावती - काही महिन्यांपूर्वी मुंबई येथे मुकेश अंबानी यांच्या अंटेलिया या निवासस्थानासमोर स्पोटके ठेवलेली गाडी आढळली होती. ती घटना ताजी असतानाच अमरावतीच्या तिवसामध्ये सुद्धा पोलिसांनी एका तरुणाकडून जिलेटीनच्या कांड्या व डिटोनेटर जप्त केल्याने खळबळ उडाली होती. जिल्ह्यातील ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील घोटा गावाच्या शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून एका व्यक्ती कडून तबल १३00 जिलेटीनच्या कांड्या व ८३५ डीटोनेटर जप्त केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपींला अटक करून स्फोटक ट्रॅक्टर बससह एकूण चार लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्फोटकांच्या वापर विहिरीमध्ये ब्लास्टिंगसाठी -
पोलिसांनी घोटा शिवारात असलेल्या शेतात गोदामावर धाड टाकली. त्यावेळी गोदामातून १३०० जिलेटीन कांड्या व ८३५ डिटोनेटर सापडले आहे. ब्लस्टिंगचे मशीन ट्रॅक्टर असा एकूण ४ लाख ३५ हजार ६२० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या स्फोटकं ₹ पोलिसांनी नाखलेला विचारणा केली असता. याचा पुरवठा मार्डी येथील ईश्वर मोरे यांनी केला असल्याचे आरोपी युवराज नाखाले याने पोलिसांना सांगितले आहे. अटक केलेल्या नखालेकडे स्फोटक बाळगण्यासाठीचा कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे स्फोटके आणि ट्रॅक्टर सुद्धा जप्त करून कुऱ्हा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी नाखले विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो या स्फोटकांच्या वापर विहिरीमध्ये ब्लास्टिंगसाठी वापरत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हेही वाचा - 'केंद्राकडून डिसेंबरपर्यंत दोनशे कोटी लस निर्मितीसाठी प्रयत्न'