ETV Bharat / state

चांदूर रेल्वे तालुक्यात युरियाचा काळाबाजार; चांडक कृषी केंद्रावर कृषी एसडीओंच्या नेतृत्वात छापा

चांदूर रेल्वे तालुक्यात युरियाचा काळाबाजार सुरू आहे. एका शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर चांडक कृषी केंद्रात आज कृषी एसडीओंच्या नेतृत्वात छापा टाकण्यता आला. यावेळी गोडाऊनमध्ये ८४ युरियाची पोती आढळून आली. संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

urea storage in amravati
चांदूर रेल्वे तालुक्यात युरियाचा काळाबाजार; चांडक कृषी केंद्रावर कृषी एसडीओंच्या नेतृत्वात छापा
author img

By

Published : Jul 24, 2020, 3:38 PM IST

अमरावती - चांदूर रेल्वे तालुक्यात युरियाचा काळाबाजार सुरू आहे. एका शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर चांडक कृषी केंद्रात आज कृषी एसडीओंच्या नेतृत्वात छापा टाकण्यता आला. यावेळी गोडाऊनमध्ये ८४ युरियाची पोती आढळून आली. संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

चांदूर रेल्वे तालुक्यात युरियाचा काळाबाजार; चांडक कृषी केंद्रावर कृषी एसडीओंच्या नेतृत्वात छापा
चांदूर रेल्वेतील शेतकरी संजय देशमुख व राजेश सोळंके हे चांडक कृषी केंद्रात युरिया घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना युरिया नसल्याचे सांगण्यात आले. मात्र खताची गाडी या कृषी केंद्रात आल्याची विश्वसनीय माहिती शेतकऱ्यांना होती. त्यांनी तत्काळ कृषी विभागाला तक्रार दिली. या तक्रारीवरून आज प्रभारी कृषी एसडीओ अजय तळेगावकर यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी सुरेखा जाधव व पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रकाश खोबरागडे यांच्या पथकाने छापा मारला. यावेळी ८४ युरियाच्या गोणी सापडल्या.

साठा असतानाही शेतकऱ्यांना न दिल्यामुळे संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच याच चांडक कृषी केंद्रात रासायनिक खत बोर्ड अद्ययावत केलेले नाही. साठा रजिस्टर अपडेट केलेले नाही. खतांचा अहवाल देखील सादर केला नसल्याचे समोर आले आहे. याचप्रमाणे अन्य काही त्रुटी आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.