ETV Bharat / state

अमरावतीत ग्रामपंचायत रणधुमाळीत कोरोनाची एंट्री - अमरावती ग्रामपंचायत रणधुमाळी

अमरावती जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक
ग्रामपंचायत निवडणूक
author img

By

Published : Dec 29, 2020, 7:41 PM IST

अमरावती - महाराष्ट्रात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अमरावती जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यासाठी जिल्ह्यातून ३ हजार ५४७ अर्ज दाखल झालेत. उमेदवारांना आपलं नामांकन दाखल करतांना कोरोना चाचणी केल्याचा अहवाल सादर करण्याचे अनिवार्य करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यात ३७ उमेदवार कोरोना बाधित आढळलेत. तर १३ निवडणूक कर्मचारी सुद्धा बाधित असल्याचा प्रकार समोर आला आहे.

ग्रामपंचायत निवडणूक

बाधित उमेदवार १७ दिवस विलगिकरणात-

मेळघाट मधील एकट्या धारणी तालुक्यात तब्बल २७ उमेदवार बाधित आढळले. तर तिवसा येथे ८, आणि अमरावती मध्ये ७ ,असे एकूण ३७ उमेदवार बाधित आढळलेत. त्यामळे बाधित उमेदवारांना १७ दिवसाच विलगिकरण करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून खबरदारी-

कोरोना बाधित उमेदवाराच्या प्रचारार्थ उमेदवाराने निवडलेल्या व्यक्तीची नेमणूक करून प्रचार करण्यास जिल्हा निवडणूक विभागाने परवानगी दिली आहे. कोरोना काळात निवडणुका होत असल्याने योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते आहे. येत्या १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूक होणार आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग सज्ज असल्याचं चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

हेही वाचा- कार डिझायनर दिलीप छाबरियांना 2 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.