ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतीमध्ये आज थंडावणार प्रचार

अमरावती जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतीमध्ये आज प्रचार थंडावणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी 15 तारखेला मतदान होणार असून 18 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे.

election-campaign-for-537-gram-panchayats-in-amravati-district-will-end-today
अमरावती जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतीमध्ये आज थंडावणार प्रचार
author img

By

Published : Jan 13, 2021, 7:28 PM IST

अमरावती - जिल्ह्यात एकूण 553 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला होता, त्यापैकी 13 ग्रामपंचायती अविरोध झाल्याने आता अमरावती जिल्ह्यात एकूण 540 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. यासाठी 15 तारखेला मतदान होणार असून 18 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे. एकूण 4 हजार 397 सदस्य पदासाठी ही निवडणूक होत आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. मात्र, रात्रीचा गुप्त प्रचार हा मतदानाच्या शेवटच्या वेळे पर्यंत चालणार आहे.

अमरावती जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतीमध्ये आज थंडावणार प्रचार

स्थानिक नेत्यांचा लागतो निवडणुकीत कस -

ग्रामपंचायतीच्या निवडणुका ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अटीतटीची होतात. यासाठी स्थानिक नेत्यांचा मोठ्या प्रमाणावर निवडणुकीसाठी कस लागतो. यंदा अमरावती जिल्ह्यात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस वंचित आघाडी प्रहार संघटना व इतर राजकीय संघटनांच्या स्वबळावर निवडणुका लढवत आहेत.

मंत्री यशोमती ठाकूर यांच्या गावातही निवडणूक -

अमरावती जिल्ह्यात अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या गावातील सुद्धा निवडणूक होत आहे. यशोमती ठाकूर यांच्या गावातील निवडणुकीचा इतिहास पाहता त्यांच्या गावात गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे मोझरी येथील निवडणूक जिल्ह्यात चर्चेचा विषय सुद्धा ठरलेली आहे. काँग्रेसकडेच मोझरी ग्रामपंचायत राहावी यासाठी गावातील कार्यकर्त्यांची जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती आहे.

1 हजार 800 पोलीस तैनात -

अमरावती जिल्ह्यात 477 सदस्य बीन विरोध झालेले आहेत. अमरावती जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून आज रात्रीपासून पोलिसांचा ग्रामीण भागांमध्ये चोखपणे बंदोबस्त असणार आहे. मतदारांना आज संध्याकाळपासून रिंगणात असलेले उमेदवार विविध प्रकारची आमिषे दाखवून त्यांच्याकडून मते घेण्याचा प्रयत्न करणार असल्याने यासाठी पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनाने भरारी पथक सुद्धा नेमलेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत गैरप्रकार होणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतलेली आहे. याबाबत आज जिल्हा पोलिस अधीक्षक हरी बालाजी यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. जिल्हात1800 पोलीस कर्मचारी या निवडणूकीसाठी तैनात असणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.