ETV Bharat / state

अमरावती : 'त्या' शाळांची मान्यता रद्द होणार, शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा

author img

By

Published : Jun 16, 2021, 7:35 PM IST

कोरोना महामारीच्या काळात अतिरिक्त शुल्क आकारणी करून, विद्यार्थी आणि पालकांची अडवणूक करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द केली जाणार आहे. संबंधित शाळांची संलग्नता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आल्याचा इशारा प्रथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.

जादा शुल्क आकारल्यास शाळांची मान्यता रद्द होणार

अमरावती - कोरोना महामारीच्या काळात अतिरिक्त शुल्क आकारणी करून, विद्यार्थी आणि पालकांची अडवणूक करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द केली जाणार आहे. संबंधित शाळांची संलग्नता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आल्याचा इशारा प्रथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.

खासगी शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र

प्राथमिक शिक्षणाधिकारी ई. झेड. खान आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी तेजराव काळे यांनी शहर आणि जिल्ह्यातील सर्व खासगी शाळांना पत्र पाठविले आहे. या पत्रामधून कोविड परिस्थिती आणि संचारबंदी लक्षात घेऊन, चालू शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम 2011 चे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच पालकांना विश्वासात घेऊन शुल्क आकारावे, असं देखील या पत्रात म्हटले आहे.

अतिरिक्त शुल्क न आकारण्याच्या सूचना

कोविड काळात सर्व काही बंद असताना, क्रीडांगण शुल्क, स्नेहसंमेलन शुल्क, वाचनालय शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, बस सेवा शुल्क यासारखे जे उपक्रम सध्या सुरू नाहीत त्यांचे शुल्क आकारू नये. अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना कोणतीही तोंडी अथवा लेखी परीक्षा घेऊ नये, तसेच देणगीचीही मागणी करू नये असेही शाळांना सांगण्यात आले आहे. तसेच शाळांनी वह्या, पुस्तके, बूट, गणवेश आदी साहित्यांची विक्री करू नये. त्याचप्रमाणे विशिष्ट दुकानातूनच हे साहित्य खरेदी करण्याची सक्ती करू नये. चालू वर्षी गणवेश देखील बदलू नये अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - नविन नियमांचे पालन करण्यात ट्विटर अपयशी - केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.