ETV Bharat / state

अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भात लाखो हेक्टरवरील पिकांचे माेठे नुकसान; शेतकरी चिंतातूर - विदर्भात लाखो हेक्टरवरील पिकांचे माेठे नुकसान

पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यात मुख्यतः सोयाबीन आणि कपाशीचे उत्पादन घेतले जाते. परंतु या वर्षीही या पिकांना पावसाचा जबर फटका बसला असून पश्चिम विदर्भातील तब्बल 3 लाख 66 हजार 302 हेक्टरवरील पिके पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेली आहे. नुकसान झालेल्या पिकामध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाले असून 2 लाख 38 हजार हेक्टरवरील सोयाबीन मातीमोल झाले आहे.

अतिवृष्टी
अतिवृष्टी
author img

By

Published : Oct 3, 2021, 3:56 PM IST

Updated : Oct 3, 2021, 4:24 PM IST

अमरावती - मागील काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांना संततधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. मराठवाड्यात तर अक्षरशः पिकांबरोबर शेतकऱ्यांची स्वप्नही या पावसासोबत वाहून गेल्याने आता शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्याबरोबरच पावसाचा फटका पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांना बसला आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यात मुख्यतः सोयाबीन आणि कपाशीचे उत्पादन घेतले जाते. परंतु या वर्षीही या पिकांना पावसाचा जबर फटका बसला असून पश्चिम विदर्भातील तब्बल 3 लाख 66 हजार 302 हेक्टरवरील पिके पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेली आहे. नुकसान झालेल्या पिकामध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाले असून 2 लाख 38 हजार हेक्टरवरील सोयाबीन मातीमोल झाले आहे. शिवाय 1 लाख 1 हजार 554 वरील कपाशीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता जगावं कस? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे.

अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भात लाखो हेक्टरवरील पिकांचे माेठे नुकसान

यंदा पश्चिम विदर्भात 14 लाख 74 हजार 281 हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. तर 10 लाख 16 हजार 431 वर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली होती. परंतु पावसामुळे या पिकांचे होत्याचे नव्हते झाले. कृषी विभागाच्या अहवालानुसार नुकसान पावणेचार लाख हेक्‍टर असले तरी यापेक्षाही जास्त नुकसान असल्याचे कृषी तज्ञांचे मत आहे. सर्वाधिक नुकसान हे बुलढाणा जिल्ह्यात झाले आहे.

पश्चिम विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान

बुलढाणा जिल्हा -

सोयाबीन - 88 हजार 36 हेक्टर
कापाशी -19 हजार 926 हेक्टर

अकोला जिल्हा -

सोयाबीन - 33 हजार 947 हेक्टर
कापाशी - 7 हजार 734 हेक्टर

वाशिम जिल्हा -

सोयाबीन - 33 हजार 250 हेक्टर
कपाशी - 481 हेक्टर

अमरावती जिल्हा -

सोयाबीन - 83 हजार 393 हेक्टर
कापशी - 66 हजार 952 हेक्टर

यवतमाळ जिल्हा -

सोयाबीन - 2676 हेक्टर
कापशी - 6641 हेक्टर

'या' पिकांनाही फटका -

या पावसामुळे विदर्भातील कापूस सोयाबीन या पिकांना सर्वाधिक फटका बसला असला तरी इतर पिकांनाही या पावसाचा फटका बसला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर, हळद, उडीद आणि नींबू यांनाही फटका बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मका, ज्वारी, पिकाला फटका बसला आहे. तर यवतमाळमध्ये भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.

'सरसगट नुकसान भरपाई मिळावी'

अमरावती जिल्ह्यातील दिनेश बावनकुळे या शेतकऱ्याने या वर्षी आपल्या शेतात सोयाबीनची लागवड केली. मे महिन्यात सोयाबीनला चांगला दर असल्याने त्यांनी या वर्षी सोयाबीन पेरणीचा निर्णय घेतला. सुरुवातीला सोयाबीन चांगले होते. त्यात दरही चांगले असल्याने दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी त्यांनी सोयाबीनवर दोन वेळा फवारणी केली. परंतु काढणीच्या वेळेत पाऊस बरसला आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. दोन दिवस पाण्याने उसंत दिल्याने त्यांनी सोयाबीन एकत्रीत करत त्याचा ढीग केला. मात्र पहाटे आलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण सोयाबीनच्या पिकात पाणी घुसल्याने सोयाबीन सडले असल्याचे दिनेश बावनकुळे या शेतकऱ्याने सांगितले आहे.

अमरावती जिल्ह्यात संत्रा बागांना पावसाचा फटका

मुसळधार झालेल्या पावसामुळे विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या वरुड - मोर्शी तालुक्यातील संत्रा बागा धोक्यात आले आहे. क्षमतेपेक्षा जास्त पाणी या बागांना झाल्याने संत्राच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची भीती

मागील वर्षी सोयाबीन आणि कपाशी हातातून गेल्याने शेतकऱ्यांनी लावलेले पैसेही निघाले नाही. यंदा शेतकऱ्यांनी सावकारांकडून आणि बँकेकडून कर्ज घेतले. परंतु यंदाही पावसाने घात केल्याने आणलेले कर्ज कसे फेडावे? अशी चिंता शेतकर्‍यांना लागली आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भात यंदाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - "राजा शेतकरी रडला"... पावसाने शेतकरी बेहाल, पोलिसाचं ह्रदय पिळवटणारं गाणं व्हायरल

Last Updated : Oct 3, 2021, 4:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.