अमरावती - मोदी सरकारकडून जो अर्थसंकल्प जाहीर केला, तो मी पूर्णपणे ऐकला आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वच स्तरातील लोकांना खूश करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. परंतु, अर्थसंकल्पातील घोषणांची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होईल, तेव्हाच मी समाधानी असेल, असे मत नैसर्गिक शेतीचे निर्माते डॉ. पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीतील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पातील झिरो बजेट शेतीवर मांडण्यात आलेल्या तरतूदींवर प्रतिक्रिया देताना सुभाष पाळेकर म्हणाले, झिरो बजट शेती ही धानपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना परवडणारी नाही. धानासारख्या पिकात शेतकऱ्यांना आंतरपीक घेता येत नाही. झिरो बजेट शेतीला 'डॉ सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती' हे नाव द्यावे, अशी मागणीसुद्धा मी केली परंतु तसे झाले नाही.
हेही वाचा - शादी डॉटकॉमवर महिलेची फसवणूक; अमरावतीच्या महिलेला २६ लाखांचा चुना
या अर्थसंकल्पात एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जास्त हात घालण्यात आला आहे. तसेच देशात सध्या महामंदी चालू आहे, सामान्य ग्राहकांना कसा फायदा होईल, यावर तरतुदी केल्या आहेत. या अर्थसंकल्पातून सर्वांनाच खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु, याची अंमलबजावणी होईल तेव्हाच समाधान व्यक्त करता येईल, असे पाळेकर यावेळी बोलताना म्हणाले.
हेही वाचा - विद्यार्थ्याने पाच रुपयांमध्ये विकली थाळी, ग्रामीण भागात शिवथाळी सुरू करण्याची मागणी