ETV Bharat / state

दमदार पावसाने बळीराजा सुखावला; अमरावती जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला सुरुवात - धामणगाव

अमरावती जिल्ह्यात दोन दिवसापाूसन पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.

अमरावती जिल्ह्यात पेरणीला सुरुवात
author img

By

Published : Jul 1, 2019, 6:02 PM IST

अमरावती - मागील अनेक दिवसापासून पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना शनिवारी दिलासा मिळाला आहे. दमदार पावसाने हजेरी लावल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता पेरणीला सुरुवात केली. यामुळे पावसाने शेती कामाला वेग आला आहे.

अमरावती जिल्ह्यात पेरणीला सुरुवात

जिल्ह्यात सोयाबीन, तूर व कपाशी या पिकाला प्रथम प्राधान्य आहे. दरम्यान, जून महिना संपत आला तरी पावसाने हजेरी लावला नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. मात्र, दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने आणि पेरणी योग्य पाणी झाल्याने शेतकरी आता पेरणीसाठी जोमाने कामाला लागला आहे. शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीनची काही प्रमाणात पेरणी केली आहे. जिल्ह्यातील तिवसा, चांदुर रेल्वे, वरुड, धामणगाव रेल्वे या तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पुढे आणखी दमदार पाऊस येईल या आशेने शेतकऱ्यांनी पेरणी मोठ्या हिंमतीने सुरू केली आहे.

दरम्यान, सध्या अलीकडे ट्रॅक्टरने पेरणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बैलजोडीने शेती पेरणारे शेतकरी अल्प प्रमाणात शेतकरी आहेत. तर अमरावतीतील एका शेतात बैलजोडीने सुरू असलेल्या पेरणीचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी...

Intro:दमदार पावसाने बळीराजा सुखावला
अमरावती जिल्ह्यात पेरणीला सुरवात

   अमरावती अँकर
गेल्या अनेक दिवसापासून पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना शनिवारी दिलासा मिळाला,  दमदार पावसाने हजेरी लावल्याने अमरावती जिल्ह्यातील  शेतकऱ्यांनी आता पेरणीला सुरवात केली आहे,पावसाने शेती कामाला वेग आला आहे,

         जिल्हात सोयाबीन,तूर व कपाशी ह्या पिकाला प्रथम प्राधान्य असून जून महिना संपत आला तरी पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता, मात्र दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने आणि पेरणी योग्य पाणी झाल्याने शेतकरी आता शेतीची पेरणीसाठी जोमाने कामी लागले आहे. , शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीनची काही प्रमाणात पेरणी केली आहे,जिल्ह्यातील तिवसा,चांदुर रेल्वे, वरुड,धामणगाव रेल्वे या तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आहेपुढे आणखी दमदार पाऊस यईल या आशेने शेतकऱ्यांनी पेरणी मोठ्या हिंमतीने सुरू केली आहे.

सध्या अलीकडे ट्रॅक्टर ने पेरणीचे प्रमान वाढले आहे.त्यामुळे बैलजोडीने शेती पेरणारे अल्प प्रमाणात शेतकरी आहे.एका शेतात बैलजोडीने सुरू असलेल्या पेरणीचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी स्वप्निल उमप याने पाहूयातBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.