ETV Bharat / state

Dispute Over Babasaheb Ambedkar Asthi : बाबासाहेबांच्या अस्थी जिल्ह्यात कोणी आणल्या? श्रेयावरून दोन गटांत रंगला वाद - Dr Babasaheb Ambedkar Asthi in Naya Akola

नया अकोला येथे बाबासाहेबांच्या अस्थी कुणी आणल्या यावरून श्रेयवाद सुरू झाला (Dr Babasaheb Ambedkar Asthi in Naya Akola) आहे. पिरकाजी खोब्रागडे आणि रामजी छापानी यांनी मुंबईवरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आणल्या होत्या. त्यामुळे या अस्थींचे मानकरी दोघेही आहोत, अशी माहिती छापानी यांनी पत्रकार परिषदेत (dispute between two groups) दिली.

Dispute Over Babasaheb Ambedkar Asthi
बाबासाहेबांच्या अस्थी
author img

By

Published : Dec 9, 2022, 9:24 AM IST

अमरावती : पिरकाजी खोब्रागडे आणि मी आम्ही दोघांनीही मुंबईवरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी खिशात टाकून सोबत आणल्या होत्या. त्यामळे या अस्थींचे मानकरी पिरकाजी आणि मी दोघेही आहोत, अशी माहिती रामजी छापानी यांनी गुरुवारी जिल्हा मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे यानंतर अस्थी कुणी आणल्या या श्रेयवादावर पडदा टाकण्याची विनंतीसुद्धा त्यांनी यावेळी (Dr Babasaheb Ambedkar Asthi in Naya Akola) केली.

काल पत्रकार परिषद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर आम्ही अमरावती वरून बडनेरा येथे गेलो. बडनेरावरून एका रेल्वेने मुंबईला पोहोचलो. मुंबईला पोहोचल्यानंतर आम्ही बाबासाहेबांच्या अंत्यसंस्काराला गेलो. रात्रभर दादरच्या चौपाटीवर कडाक्याच्या थंडीत मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यशवंतराव आंबेडकर आणि त्यांचे पुतने मुकुंदराव हे बाबासाहेबांच्या अस्थी गोळा करत असताना खोब्रागडे आपण त्यात मिसळलो. डॉ. बाबासाहेबांच्या अस्थी गोळा करून त्यातील काही अस्थी आपण खिशात ठेवल्या आणि दोघेही अमरावतीला (dispute between two groups) परतलो.

प्रतिक्रिया देताना रामजी छापानी,बाबासाहेबांच्या अस्थी आणनारे

चुकीची माहिती : अमरावतीला परतल्यानंतर आपल्याकडील अस्थी आपण पिरखाजी खोब्रागडे यांना दिल्या. पिरकाजी यांनी नया अकोला येथे त्यांच्या घरी नेल्या व जतन करून ठेवल्या असे रामजी छापाणी यांनी महापरिनिर्वाण दिनी आयोजित कार्यक्रमात म्हटले होते. त्यांच्या विधानावर खोब्रागडे कुटुंबीयांनी आक्षेप घेत रामजी छापानी यांनी चुकीची माहिती दिल्याचे दिनांक ७ नोव्हेंबरला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खोब्रागडे आणि गावातील ईतर मंडळींनी सांगितले (Dr Babasaheb Ambedkar Asthi in Naya Akola) होते.

श्रेयवादाची लढाई : रामजी छापानी आणि कुटुंबीय यांनी काल दिनांक ८ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत सांगितले की, आता ही श्रेयवादाची लढाई थांबायला हवी. चिमूटभर राजकारणी व भडकविणारे व्यक्ती यांच्यापासून आम्ही सावध राहायला पाहिजे. ६ डिसेंबर हा आपल्या बापाचा दुःखाचा दिवस असताना हा वाद नको आहे. कारण हा वाद विकोपाला जाऊ देणे कोणालाही परवण्यासारखे नसल्याचे त्यांनी सांगितले. या अस्थींचे मानकरी पिरकाजी खोब्रागडे आणि मी आम्ही दोघेच आहोत, अशी माहिती रामजी छापानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. अस्थीच्या वादाला माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर आणि स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते यांच्या अंतर्गत वादाची किनार असल्याचे (Dispute Over Ambedkar Asthi in Naya Akola) समजते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.