ETV Bharat / state

लॉकडाऊन काळात दिशाहीन झालेल्या गुन्हा पीडित कुटुंबाना 'दिशा' संस्थेचा मदतीचा हात - disha ngo help vitims

अमरावती जिल्ह्यातील दीडशे आणि यवतमाळ जिल्ह्यात असणाऱ्या शंभर गुन्हा पीडित कुटुंबीयांची माहिती मिळवून त्यांच्या बँक खात्यात 1800 ते 2000 हजार रुपये एप्रिल आणि मे महिन्यात टाकण्यात आले. ही रक्कम त्यांना महिन्याच्या उदरनिर्वाहासाठी कामात आली.

लॉकडाऊन काळात दिशाहीन झालेल्या गुन्हा पीडित कुटुंबाना 'दिशा' संस्थेचा मदतीचा हात

author img

By

Published : May 27, 2020, 5:55 PM IST

अमरावती - कोरोनाच्या संकटामुळे समाजव्यवस्थेतील अनेक घटकांवर विपरीत परिणाम झाला आहे. गरिबांना बिविध सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी आर्थिक स्वरूपात मदतीचा हात मिळतो आहे. असे असताना समाजातील पीडित हा एक घटक मात्र चांगलाच भरकटला असून या दिशाहीन झालेल्या अनेक गुन्हा पीडित कुटुंबांना अमरावतीच्या 'दिशा' संस्थेकडून मिळालेली मदत या कुटुंबांच्या आयुष्याला नवे वळण देण्यासाठी दिशादर्शक ठरते आहे.

लॉकडाऊन काळात दिशाहीन झालेल्या गुन्हा पीडित कुटुंबाना 'दिशा' संस्थेचा मदतीचा हात

खुनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये ज्या कुटुंबातील प्रमुख बळी पडतो किंव्हा ज्या कुटुंबातील युवती, महिला यांच्यावर अत्याचार होतो असे कुटुंब पूर्णतः देशोधडीलाच लागते. अशा कुटुंबांना जगण्यासाठी अनेक अडचणी येतात. अनेकदा कर्तापुरुष अचानक हरविल्यामुळे अनेक गरीब आणि गरजू कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. अशा परिस्थितीत पीडित व्यक्तीचे म्हातारे आई-वडील त्याची विधवा पत्नी यांच्या आयुष्यात जणू अंधार निर्माण होतो. अशा परिस्थितीत कुटुंबातील सारे दुः ख बाजूला सारून जगण्यासाठी धडपड करीत असतात. त्यांची मुले शिक्षण सोडून किंवा शिक्षणाकडे दुर्लक्ष करून आपल्या आईला या परिस्थितीमध्ये हातभार लावतात आणि आर्थिक आधार देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. कुठलेही ज्ञान आणि कौशल्य अंगी नसताना अचानकपणे उपजीविकेसाठी मिळेल ते काम करण्यासाठी बाहेर पडण्याची वेळ त्यांच्यावर अचानक आल्यामुळे ते अक्षरशः हादरून जातात.

अमरावती जिल्ह्यात अशा गुन्हा पीडित कुटुंबाची संख्या दीडशे आहे. यवतमाळमध्ये असे शंभर कुटुंब हलाखीचे जीवन जगत आहेत. आता लॉकडाऊनच्या काळात तर अशा कुटुंबाचे कंबरडेच मोडले आहे. मुळातच अशा गुन्हा पीडितांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या अपुऱ्या सुविधा तसेच अशा परिस्थितीमध्ये काय करावे आणि काय करू नये यासंबंधी माहिती व मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे असे कुटुंब विविध समस्यांना तोंड देत आहेत. पूर्वी आरोपीला शिक्षा म्हणजेच पीडितांचे पुनर्वसन ही संकल्पना समाजामध्ये दृढ असल्यामुळे पुनर्वसनाच्या दृष्टीने समाजाची एकंदर उदासीनता यामुळे अशा गुन्हा पीडित कुटुंबासमोर विविध प्रश्न उभे ठाकले आहेत.

पीडित कुटुंबांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या अमरावतीच्या दिशा संस्थेच्यावतीने लॉकडाऊनच्या काळात मदतीचा हात दिला आहे. अमरावती सोबतच यवतमाळमध्येही अशा गुन्हा पीडित कुटुंबाची समस्या गंभीर आहे. पीडित कुटुंब शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागात विखुरले असून त्यांची माहिती ही केवळ पोलीस आणि आणि न्यायालयाकडे असल्यामुळे त्यांना ओळखणे, त्यांची मदत करणे हे काम काम हवे तितके सोपे नाही. असे असताना दिशा संस्थेच्यावतीने अशा काही कुटुंबांना लॉकडाऊन काळात आधार मिळाला आहे.

अमरावती जिल्ह्यातील दीडशे आणि यवतमाळ जिल्ह्यात असणाऱ्या शंभर गुन्हा पीडित कुटुंबीयांची माहिती मिळवून त्यांच्या बँक खात्यात 1800 ते 2000 हजार रुपये एप्रिल आणि मे महिन्यात टाकण्यात आले. ही रक्कम त्यांना महिन्याच्या उदरनिर्वाहासाठी कामात आली. लॉकडाऊनच्या काळात या कुटुंबाने बाहेर जाऊ नये, अशी विनंतीही करण्यात आली, असे दिशा संस्थेचे प्रमुख प्रवीण खांडपासोळे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. लॉकडाऊन संपल्यावर गुन्हा पीडितांच्या कुटुंबाचे पुनर्वसन कसे करता येईल, यासाठी शासनाच्या मदतीने पुढाकार घेतला जाईल असेही प्रवीण खांडपासोळे यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.