ETV Bharat / state

रेमडेसिवीर काळाबाजारप्रकरणी कठोर कारवाई करावी : देवेंद्र फडणवीस - remdesivir-injection-in-back-market in amravti

अमरावती येथे नुकतेच रेमडेसिवीरच्या काळाबाजाराचे एक रॅकेट पकडण्यात आले. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. यातील ५ व्यक्ती हे शासकीय रूग्णालयांमध्ये काम करणारे आहेत, तर त्यापैकी २ तर थेट अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी अशा वरिष्ठ पदांवर काम करणारे आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य मोठे आहे.

devendra fadanvis
devendra fadanvis
author img

By

Published : May 16, 2021, 5:56 PM IST

अमरावती - शहरात रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना याबाबतचे पत्रही लिहिले आहे.

भाजपाच्या स्थानिक नेत्यांनीही चौकशीची मागणी
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळा बाजारप्रकरणी भाजपा नेत्यांनी तपास करण्याची गरज व्यक्त केली होती. रेमडेसिवीर घोटाळ्यात मोठे मासे अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी थातूरमातूर कारवाई केली जात आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. अमरावतीच्या रेमडेसिवीर घोटाळ्यातील खरा "सचिन वाझे" कोण, याचा तपास लागावा, अशी जनभावना आहे. स्थानिक भाजपा नेत्यांनी याच दिशेने आपला पाठपुरावा चालवला आहे. आता राज्याच्या विरोधीपक्ष नेत्यांनी थेट पोलीस महासंचालकांकडे मागणी केल्यानंतर या प्रकरणाचा तपास अधिक गांभीर्याने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सखोल चौकशीची गरज
अमरावती येथे नुकतेच रेमडेसिवीरच्या काळा बाजाराचे एक रॅकेट पकडण्यात आले. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. यातील ५ व्यक्ती हे शासकीय रूग्णालयांमध्ये काम करणारे आहेत, तर त्यापैकी २ तर थेट अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी अशा वरिष्ठ पदांवर काम करणारे आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य मोठे आहे. असे असताना त्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची साधी पोलीस कोठडी सुद्धा मागितली जाऊ नये, हे अतिशय गंभीर असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. मुळातच रेमडेसिवीरचा पुरवठा हा जिल्हाधिका-यांमार्फत थेट रूग्णालयांना केला जातो. त्यामुळे कुठलीही खासगी व्यक्ती रेमडेसिवीर वितरित करू शकत नाही. असे असताना शासकीय यंत्रणेतूनच हे काळाबाजारीचे रॅकेट चालत असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी होणे नितांत गरजेचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

कठोर कारवाईची मागणी
या संकटाच्या काळात अनेक रूग्ण औषधाविना तडफडत आहेत. अशात त्याच औषधांचा काळाबाजार घातक आहे. अमरावती जिल्ह्यातून या प्रकरणाबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यातून एकूणच स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे आपण याबाबत अधिक लक्ष घालून कठोरातील कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.