अमरावती - राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच ओमायक्रॉन या व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री देखील कोरोनाच्या विळख्यात सापडताना दिसत आहेत. ज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना ( Yashomati Thakur tests positive for Covid-19 ) कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, असे असतानाही त्यांची काम करण्याची जिद्द आणि इच्छा तसूभरही कमी झालेली नाही. फायलींचा ढीग उपसून काम सुरूच ठेवल्याची माहिती एका चित्रफितीद्वारे समोर आली आहे.
सध्या त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. मात्र, त्यांनी रुग्णालयातही आपल्या दैनंदिन कामकाज सुरू ठेवल्याचे दिसते आहे. रुग्णालयातील बेडवर बसूनच त्या फायलींचा ढिगारा उपसत असल्याचे एका चित्रफितीद्वारे समोर आले आहे.
हेही वाचा - Sindhutai Sapkal passed away : अनाथांची माय काळाच्या पडद्याआड: आज दुपारी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार