ETV Bharat / state

Devendra Fadnavis : मागील सरकार फेसबुकवर लाईव्ह अन् जनतेमध्ये ऑफ होते -देवेंद्र फडणवीसांची टीका - अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी डॉक्टर रणजीत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित संवाद सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दसरा मैदान येथे हजेरी लावली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका केली.

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
author img

By

Published : Jan 11, 2023, 8:17 PM IST

प्रतिक्रिया व्यक्त करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाल्यावर पाच वर्ष राज्यातील सर्वच वर्गाचा आणि सर्वच क्षेत्राचा विकास व्हायला लागला. मागच्या अडीच वर्षात मात्र राज्यात महाविकास आघाडीचे जे सरकार होते, ते केवळ फेसबुकवर लाईव्ह होते आणि जनतेमध्ये डेड होते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर अमरावती येथे केली. अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी डॉक्टर रणजीत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित संवाद सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील दसरा मैदान येथे उपस्थितांना संबोधित केले.

डॉक्टर रणजीत पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर : अमरावती पदवीधर मतदार संघात सलग दोन वेळा विजयी झालेले भाजपचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांच्या विरोधात काँग्रेसने अद्यापही उमेदवार जाहीर केला नाही. उमेदवारी घेण्यासाठी देखील काँग्रेसमध्ये कोणी धाडस करायला तयार नाही, अशा परिस्थितीत डॉक्टर रणजीत पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत आयोजित समाज सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस, खासदार प्रताप जाधव यांच्यासह बडनेरा चे आमदार रवी राणा, जळगाव जामोद चे आमदार संजय कुठे, अकोल्याचे आमदार रणजीत सावरकर, चिखलीच्या आमदार श्वेता महाले, वाशिमचे आमदार संजय पाटणी, निवडणूक प्रमुख चैनसुख संचेती प्रामुख्याने उपस्थित होते.

आम्हाला हवं, जनतेचे भलं : सत्ता ही केवळ समाजाच्या विकासासाठी आम्हाला हवी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ भ्रष्टाचाराच्या माध्यमातून स्वतःचेच भले केले आहे. आम्हाला मात्र जनतेचं भलं हवं, असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात पाच हजार शासकीय नोकऱ्या जाहीर केल्या. या नोकऱ्यांमध्ये त्या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केले. आम्ही मात्र पदवीधरांचा विचार करून पन्नास हजार शासकीय जागा काढल्या आहेत. या सर्व जागा पारदर्शक पद्धतीने भरल्या जाणार असून; कुठेही भ्रष्टाचार होणार नाही, असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गेल्या सरकार मध्ये वर्क फ्रॉम जेलही : मागच्या सरकारच्या काळात कोरोना आला होता, अशा परिस्थितीत राज्याचे प्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले होते. मुख्यमंत्र्यांचे सर्व काम हे वर्क फ्रॉम होम होते. दुर्दैवाने काही मंत्री जेलमध्ये गेले असताना मुख्यमंत्र्यांनी नैतिकदृष्ट्या त्यांचा राजीनामा घेणे अपेक्षित होते. मात्र तसे धाडस तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे झाले नाही. यामुळेच अशा मंत्र्यांचे वर्क फ्रॉम जेल देखील मागच्या सरकारच्या काळात सुरू होते, अशी टीका देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद सभेत केली.

82 कोटीचा वैनगंगा नळगंगा प्रकल्प : विदर्भातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा, यासाठी 82 कोटी रुपयांचा वैनगंगा नळगंगा प्रकल्प आम्ही आता हाती घेतला आहे. हा प्रकल्प जाहीर करताना आमच्यावर इतकी मोठी रक्कम कुठून आणणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाच वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गाची घोषणा केली. त्यावेळी देखील असेच प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र 50 कोटी रुपयांचा समृद्धी महामार्ग प्रकल्प आम्ही यशस्वी करून दाखवला. समृद्धी महामार्गाद्वारे राज्याचा सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास होणार आहे. समृद्धी महामार्ग प्रमाणेच आता वैनगंगा नळगंगा हा प्रकल्प विदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पाद्वारे विदर्भातील पाण्याची समस्या तर सुटेलच, मात्र गरज भासल्यास मराठवाड्याला देखील आम्ही पाणी देऊ शकतो, इतका हा प्रकल्प महत्त्वाचा आणि मोठा असेल असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा : Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेने उद्योजकांना दिलासा: मात्र अंमलबजावणी कधी?

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.