अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कुलगुरू, प्र कुलगुरू, कुलसचिव यांच्यासह सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचारी हे अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे एक व्यक्ती अनेक कामे अतिशय जबाबदारीने पार पाडतो. अशावेळी विद्यापीठाची बदनामी (Amravati University Defamation Mischief) करणे हे अतिशय चुकीचे असून विद्यापीठाला बदनाम करण्याचा खोडसाळपणा (Amravati University Vice Chancellor Defamation Case) करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांची चौकशी व्हायला हवी, अशी भावना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली. (Amravati University Defamation)
कुलगुरूंची बदनामी करणाऱ्या पत्रकांमुळे खळबळ - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांची बदनामी होईल, अशा स्वरुपाचा मजकूर असणारे पत्र बुधवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील अनेक शैक्षणिक आणि प्रशासकीय विभागात वितरित करण्यात आले होते. हे पत्रक नेहमी कोणी टाकले याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृत्य - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिलेक्ट ची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत राज्यपाल नामित आणि कुलगुरू नामी तसंच त्यांना थेट सिनेटमध्ये संधी मिळते. ज्या व्यक्तींची निवडून येण्याची कुवत नाही अशा व्यक्तींना कुलगुरूंच्या माध्यमातून थेट सिनेटमध्ये यायचे असल्यामुळे कुलगुरूंवर दबाव आणण्याचे तंत्र अशा गैरप्रकारातून करण्याचा उद्देश तर अशा प्रकारच्या माध्यमातून केला जात असावा असा संशय विद्यापीठातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केला जातो आहे.
कुलगुरू रुग्णालयात दाखल - कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे हे विद्यापीठाच्या नुकत्याच आटोपलेल्या युवा महोत्सवात प्रचंड व्यस्त असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर धावपळीचा परिणाम झाला आहे. गत चार दिवसांपासून त्यांच्यावर अमरावती शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्लेटलेट्स कमी कमी झाल्या होत्या आता मात्र प्लेटलेट नियंत्रणात आहे आता त्यांची प्रकृती बरी असून त्यांना आज रुग्णालयातून सुट्टी मिळणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ईटीव्ही भारत शी बोलताना सांगितले.