अमरावती - बांधकाम सुरू असलेल्या घरात ग्रामसेवकाचा मृतदेह सापडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा या गावात ही घटना घडली. त्र्यंबक तायडे (रा. पिंपळगाव निपाणी) असे मृताचे नाव आहे.
त्र्यंबक तायडे हे मंगरूळ चव्हाळा या गावातील एका बांधकाम सुरू असलेल्या घराची पाहणी करायला आले होते. यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान, तायडे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे मात्र अद्यापही समोर आले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - अमरावतीकरांना अवकाळी पावसाने झोडपले, वातावरणात पुन्हा गारवा