ETV Bharat / state

Datta Jayanti 2021 : अमरावतीच्या झिरी येथे दत्त जयंती उत्सवाची 97 वर्षांपासूनची परंपरा

झिरी येथील एकमुखी दत्त मंदिरात ( Datta Mandir Jhiri ) 97 वर्षांपासून दत्त जयंती उत्सव ( Datta Jayanti Celebration ) साजरा होत आहे. गतवर्षी कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने दत्त जयंती उत्सव साजरा झाला नसला तरी यावर्षी कोरोना नियमांचे पालन करून मंदिरात दत्त जयंती उत्सव होतो आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून मंदिर परिसर रोषणाईने झगमगले असून हार फुलांनी सजवण्यात आले आहे.

Datta Jayanti 2021
झिरी येथे दत्त जयंती उत्सव
author img

By

Published : Dec 18, 2021, 12:36 AM IST

अमरावती - अमरावती यवतमाळ मार्गावर बडनेरा लगत झिरी येथील एकमुखी दत्त मंदिरात ( Datta Mandir Jhiri ) 97 वर्षांपासून दत्त जयंती उत्सव ( Datta Jayanti Celebration ) साजरा होत आहे. गतवर्षी कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने दत्त जयंती उत्सव साजरा झाला नसला तरी यावर्षी कोरोना नियमांचे पालन करून मंदिरात दत्त जयंती उत्सव होतो आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून मंदिर परिसर रोषणाईने झगमगले असून हार फुलांनी सजवण्यात आले आहे.

झिरी येथे दत्त जयंती उत्सवाची 97 वर्षांपासूनची परंपरा

1924 मध्ये झाली मूर्तीची स्थापना -

9 मार्च 1919 रोजी झिरी परिसरातील धाराशिव शंकराच्या अंगणातील उंबराच्या पारावर श्री सिताराम महाराज टेंबे ( Sri Sitaram Maharaj Tembe Jhiri ) यांनी प्राणायाम व प्रणव उच्चार करीत समाधी घेतली. सिताराम महाराजांच्या समाधीसमोर मंदिर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी हिंगोली येथील हेमराज सेठ ( Hemraj Seth )यांच्याकडे असणारी एक मुखी श्री दत्त मूर्ती झिरी ( Shri Dutt Murti Zhiri ) येथे आणण्यात आली. 12 जून 1924 रोजी या एक मुखी दत्ताच्या मूर्तीची शास्त्रोक्त आणि विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

अशी आली झिरी येथे एकमुखी दत्ताची मूर्ती -

हिंगोली येथील हेमराज सेट यांच्याकडे असणारी एक मुखी दत्ताची मूर्ती झिरी येथे आणण्यापूर्वी काही व्यक्तींनी मंदिर बांधून या मूर्तीची स्थापना करण्याचा मानस केला होता. मात्र ही मूर्ती हिंगोली येथून बाहेर नेण्यास अनेकदा अडचणी आल्या. परभणी जिल्ह्यातील गुंज येथे सुद्धा ही मूर्ती नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र या मूर्तीच्या स्थापनेसाठी बांधण्यात येत असलेला सभामंडप कोसळल्यामुळे ही मूर्ती परभणी बाहेर जाऊ शकली नाही. गुंज संस्थान येथील पुजारी बापू देव महाराज यांना या मूर्तीने दृष्टांत देऊन अमरावती शहरालगत बडनेरा परिसरात पोहोचवा असे सांगितल्याची आख्यायिका असली तरी जी येथील दत्त मंदिरात स्थापन करण्यात आलेली एक मुखी दत्ताची मूर्तीही हिंगोली येथून झिरीला आली हे मात्र सत्य आहे.

मंदिर परिसर रोषणाईने झगमगले असून हार फुलांनी सजवण्यात आले आहे

कोरोना नियम पाळून साजरा होतो आहे उत्सव

कोरोनामुळे गतवर्षी झिरी येथील श्री दत्त मंदिर बंद होते. यामुळे गतवर्षी दत्त जयंती उत्सव सुद्धा या मंदिरात होऊ शकला नाही. यावर्षी मात्र मंदिर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी श्री दत्त जयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थेचे सचिव किरण हातगावकर यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली. दत्त जयंती निमित्य मंदिरात किर्तन भजन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत यावर्षी चा उत्सव साजरा होतो आहे. मंदिरात गर्दी करु नये असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले असून दत्तभक्त ही या आव्हानाला प्रतिसाद देऊन सहकार्य करीत असल्याचे किरण हातगावकर म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.