अमरावती - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र, आता अमरावती जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या नियमात काही बदल करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
नवीन नियमावली -
बंद असलेले सर्व दुकाने आता उद्यापासून सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उघडण्यास सूट देण्यात आली आहे. तरी सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी असणार आहे, असे आदेश परित करण्यात आले आहे. नवीन नियमानुसार हॉटेल उघडण्यावर निर्बंध कायम आहे. फक्त पार्सल सेवा सुरू राहणार आहे. तसेच लग्न समारंभासाठी २० लोकांची परवानगी आता देण्यात आली आहे. तसेच शाळा महाविद्यालय, जिम, क्लास हे मात्र अद्यापही बंद राहणार आहे. तसेच सर्व राजकीय, शासकीय, सामाजिक, जलतरण तलाव व आदी कार्यक्रम सोहळे हे बंद राहणार आहेत.
हेही वाचा - दुचाकी खडीवर घसरल्याने आई व मुलाचा एरंडोलमध्ये जागीच मृत्यू
दुकानदारांना आता दुकानात मास्क वापरणे बंधनकारक आहे. त्याचे पालन न केल्यास ८ हजारांचा दंड दिला जाणार आहे. त्यासाठी आता जिल्हाभरात ३० पथक तैनात केले जाणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.