ETV Bharat / state

Amravati Curfew Impact : अमरावतीमधील संचारबंदीचा शेतकऱ्यांना फटका; सहा दिवसांपासून बाजार समिती बंद - Curfew Impact on Farmer

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती मागील सहा दिवसांपासून बंद आहे. याचा फटका जिल्ह्यातील शेतकर्‍यांना बसत आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू आहे आणि या हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. परंतु बाजार समितीच बंद असल्याने सोयाबीन व आदी शेतमाल विकावा तरी कुठे? असा प्रश्न देखील शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे तत्काळ बाजार समिती सुरू करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहे.

शेतकऱ्यांना फटका
शेतकऱ्यांना फटका
author img

By

Published : Nov 20, 2021, 4:08 AM IST

Updated : Nov 20, 2021, 4:23 AM IST

अमरावती - शहरात झालेल्या हिंसाचारानंतर संचारबंदी (Amravati Curfew) लावण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये फक्त अत्यावश्यक दुकानांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती मागील सहा दिवसांपासून बंद आहे. याचा फटका जिल्ह्यातील शेतकर्‍यांना (Amravati Curfew Impact) बसत आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू आहे आणि या हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. परंतु बाजार समितीच बंद असल्याने सोयाबीन व आदी शेतमाल विकावा तरी कुठे? असा प्रश्न देखील शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे तत्काळ बाजार समिती सुरू करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहे.

अमरावतीमधील संचारबंदीचा शेतकऱ्यांना फटका

खरीप हंगामातील सोयाबीन पीक घरी आल्यानंतर शेतकऱ्यांची लगबग रब्बी हंगामासाठी सुरू झाली आहे. सध्या शेतकरी हरभरा, गहू आणि कांदासह आदी रब्बी हंगामातील पिके घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी लागवडीला खर्च येतो. शेतमाल विकून शेतकरी आपल्या शेतात रब्बी हंगामाची तयारी करत असतात. परंतु सहा दिवसांपासून संचार बंदीमुळे अमरावती बाजारपेठ पूर्णतः बंद आहे. त्यामुळे शेतमाल विकावा कुठे असा सवाल शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असते. परंतु मागील सहा दिवसांपासून येथील व्यवहार पूर्णतः ठप्प झाले आहे.

'लागवड करावी कशी?'

अमरावती जिल्ह्यातील शेंदोळा येथील शेतकरी संजय भोयर यांना आता सध्या गहुची लागवड करायची आहे. परंतु त्यांच्याकडे सध्या सोयाबीन आहे. सोयाबीन विक्रीसाठी बाजारपेठच नसल्यामुळे सोयाबीन कुठे विकावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे त्यांनी बाजारपेठ लवकर सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या मजूरांचे हाल

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेकडो मजूर काम करत असतात. दिवसभर काम केल्यानंतर त्यांच्या घरची चूल पेटत असते. परंतु बाजार समिती सहा दिवसांपासून बंद असल्यामुळे येथील मजुरांच्या हाताला काम नाही, त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा - Amravati Internet Service : सहा दिवसानंतर अमरावती शहरातील इंटरनेट सेवा पूर्ववत

Last Updated : Nov 20, 2021, 4:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.