अमरावती - महाराष्ट्रात पडत असलेल्या पावसामुळे चिखलदारामधील भीमकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. पावसाने दडी मारल्याने अमरावतीच्या चिखलदरा मधील भीमकुंड धबधबा ओस पडला होता. मात्र, पहिल्याच पावसात भीमकुंड धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग बनला आहे.
भीमकुंड धबधबा 3 हजार 500 फूट खोल दरीत कोसळतो. इतक्या उंचीवरुन कोसळणाऱ्या धबधब्याचा आनंद घेणे ही पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. त्यामुळे या ठिकाणी हजारो पर्यटक दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.