अमरावती - येथील जवाहर गेट हे इतिहासकालीन असून यातील भागात हनुमानजींचे मंदिर आहे. हे मंदिर अंबानगरीत गढीचा मारुती या नावाने प्रसिद्ध आहे. एकेकाळी अमरावतीला उंबरावती म्हणून ओळख असलेल्या जवाहर गेट परिसरातील गावाच्या मानाचा समजला जाणाऱ्या हनुमान मंदिर मूर्तीच्या अंगावरील शेंदुराची खोळ पडल्याने भाविक व नागरिकांनी ही खोळ आणि पुरातन ३०० वर्ष पूर्वीची मूर्ती पाहण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती.
स्थानिक खरकाडीपुरा येथील ३०० वर्ष पूर्वीच्या हनुमान मंदिराचा जीर्णोधार सुरू आहे. मात्र या हनुमान मंदिराच्या गाभाऱ्यातील भाग सोडला तर बाहेरील भागाचे काम सुरू आहे. या दरम्यान हनुमानजींच्या मूर्तीची याच काळात खोळ पडणे व मूर्तीचे सुंदर रूप पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत.