ETV Bharat / state

सोयबीन तर गेलेच.. आता कपाशीची बोंडेही सडली, पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

author img

By

Published : Oct 17, 2020, 3:20 PM IST

अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टर कपाशी पीक परतीच्या पावसामुळे धोक्यात आले आहे. अतिपावसामुळे कपाशीचे बोंडे सडली असून कापूस झाडावरच काळा पडला आहे.

cotton crop damage due to heavy rain in amravati district
सोयबीन तर गेलाच... आता कपाशीची बोंडे सडली, पावसाने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान

अमरावती - तीन महिन्यात हाती येणारे खरिपाचे सोयाबीन पीक यंदा पार हातून निघून गेले, खोडकिडा व परतीच्या पावसाने सोयाबीन माती मोल झाले तर आता सततच्या पावसामुळे कपाशी पिकालाही फटका बसला आहे. अतिपावसामुळे कपाशीचे बोंडे सडली असून कापूस झाडावरच काळा पडला आहे.

शेतकरी आपली व्यथा व्यक्त करताना...
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वणी येथील बाळकृष्ण लवनकर या शेतकऱ्यांने पाच एकर शेतात कपाशीची लागवड केली होती. यात त्यांना दीड लाख रुपयांचा खर्च आला. मात्र परतीचा पाऊस त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरला. ही परिस्थिती एकट्या बालकृष्ण या शेतकऱ्यांची नसून याच तालुक्यातील सुनील टोने या शेतकऱ्याची सुद्धा आहे.

अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टर कपाशी पीक परतीच्या पावसामुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे आता सोयाबीन व कपाशी पीक हातून गेल्यानंतरही केवळ नुकसानीचे सर्वेक्षण प्रशासनाकडून केले जात असून प्रत्यक्षात नुकसान भरपाई केव्हा मिळणार? हा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार का? हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा - अमरावती बाजार समितीत पावसामुळे सोयाबीन भिजले; व्यापारी सोयाबीन घेईना !

हेही वाचा - अमरावतीत युवा शेतकऱ्याची आत्महत्या...कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीला कंटाळून उचलले पाऊल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.