अमरावती- देशभरात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. सध्या राज्यात आणि देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची अर्थात डबल म्युटेशनची सुरवात ही अमरावतीमधून झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनला अमरावती स्ट्रेनही म्हटले जात असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख म्हणाले, की विषाणुमध्ये होणारे बदल हे विषाणुसाठी पोषक असतात. त्यामुळे कोरोना विषाणुमध्येही अनेक म्युटेशन बदलली आहेत. सध्या मध्य भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यात विषाणुमध्ये असलेल्या म्युटेशनला अमरावती म्युटेशनची म्हणून ओळखले जात असल्याच देशमुख म्हणाले.
हेही वाचा-...तर महाविकास आघाडी सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल - राजू शेट्टी
नव्या म्युटेशनमुळे संसर्गाचे प्रमाण अधिक-
पहिल्या लाटेच्या तुलनेत या म्युटेशनमध्ये कोरोनाचा संसर्ग हा मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे आता कुटूंबातील एकाला कोरोना झाला तर परिवारातील अनेकांना कोरोनाची बाधा होत आहे. हे या नव्या म्युटेशनमुळे होत असल्याचे समोर आल्याचे देशमुख म्हणाले.
हेही वाचा-ऑक्सिजनकरता धावाधाव : भारत १० हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्सची करणार आयात
दोन्ही कोरोना विषाणुवर लस प्रभावी-
भारतात कोरोना विषाणूचा जो दुसरा आणि तिसरा प्रकार (व्हॅरिअंट) आढळला आहे, त्यांचे स्वरूप जवळपास एकच आहे आणि शास्त्रज्ञांच्या मते, सध्या भारतात ज्या कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध आहेत, त्या या दोन्ही प्रकारावर अत्यंत प्रभावी आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायो मेडिकल जिनोमिक्सचे (जनुकीय) सौमित्र दास यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.