अमरावती- दऱ्या खोऱ्यात वसलेले विदर्भाचे नंदनवन आणि थंड हवेचे ठिकाण चिखलदरा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून याठिकाणी पर्यटनासाठी पर्यटक येतात. मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे येथील पर्यटन व्यवसायाला फटका बसला आहे.
हेही वाचा- औरंगाबाद : देवगाव रंगारी येथील जवानाला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण
कोरोना व्हायसने सर्वांत जास्त फटका बसला असेल ते पर्यटन व्यवसायाला. पर्यटन व्यवसाय पर्यटकांशिवाय चालू शकत नाही. लाॅकडाऊने प्रवाशी वाहतूक बंद झाली. संचारबदी लावण्यात आली त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता घराबाहेर पडण्यास कोणालाही मुभा नाही. त्यामुळे पर्यटन व्यवसाय प्रभावीत झाला. पर्यंटन स्थळी सध्या शुकशुकाट पहायला मिळत आहे.
चिखलदरा येथे येणाऱ्या पर्यटकांवर आदिवासी लोकांचा रोजगार अवलंबून असतो. मात्र, पर्यटक नसल्याने रोजगार बुडाला असून येथील व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सातपुडा पर्वतांच्या कुशीत वसलेले चिखलदरा हे विलोभनीय पर्यटनस्थळ देश-विदेशातील पर्यटकांचे पावसाळ्यात लक्ष वेधून घेते. वर्षभरही पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात. सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले चिखलदरा नेहमीच आपल्या सौंदर्याने पर्यटकांना खुणावते. मात्र, कोरोनामुळे चिखलदराचे पर्यटन बंद करण्यात आल्याने या ठिकाणी शुकशुकाट दिसत आहे.