ETV Bharat / state

अमरावतीतील वलगाव येथे लॉकडाऊनचा फज्जा; भाजीबाजारात नागरिकांची गर्दी - अमरावती लॉकडाऊन न्यूज

अमरावती जिल्हात 22मेपर्यंत कडक लॉकडाऊन आहे. तर आजपासून (रविवार) जिल्हात दुसऱ्या टप्प्याच्या लॉकडाऊनला सुरवात झाली आहे. या लॉकडाऊन दरम्यान भाजीपाला, किराणामालासह फळ विक्रीला घरपोच सेवेला परवानगी देण्यात आली आहे.

corona rules break in Valgaon amravati
author img

By

Published : May 16, 2021, 5:35 PM IST

अमरावती - जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन 22एप्रिलपर्यत पुन्हा वाढवला आहे. पण यात काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे भाजीपाला, किराणा, फळे, दूध आदी खाद्य पदार्थांना घरपोच सुविधा देण्याचे आदेश आहेत. मात्र, अमरावती नजीकच्या वलगावमधील व्यावसायिक व नागरिकांनी या आदेशाला हरताळ फासत बाजारपेठेत मोठी गर्दी केल्याच चित्र आज (रविवारी) सकाळी पाहायला मिळाले. यावेळी दुकानांवर कुठलेही सोशल डिस्टन्सचे पालन तर सोडाच अनेकांनी मास्कदेखील लावला नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नागरिकांचा बेजबाबदारपणा पुन्हा समोर
अमरावती जिल्हात 22मेपर्यंत कडक लॉकडाऊन आहे. तर आजपासून (रविवार) जिल्हात दुसऱ्या टप्प्याच्या लॉकडाऊनला सुरवात झाली आहे. या लॉकडाऊन दरम्यान भाजीपाला, किराणामालासह फळ विक्रीला घरपोच सेवेला परवानगी देण्यात आली आहे. अमरावतीपासून 10 किमी अंतरावर असलेल्या वलगाव येथे आज सकाळी मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडले. यात भाजीपाला व फळे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड पहायला मिळाली. यावेळी अनेकांनी मास्क लावले नव्हते. त्यामुळे नागरीकांचा बेजबाबदारपणा पुन्हा समोर आला आहे. परंतु प्रशासनाचे अधिकारी व पोलीस कोठेही दिसून आले नाही. त्यामुळे प्रशासन झोपले की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.