ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: अमरावती जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयावर कोरोनाचे सावट...

रुग्णालयात दाखल महिलांना सर्दी, ताप, खोकला, अशी लक्षणे आढळली की त्यांना इतर वॉर्डमध्ये ठेवले जाते. तसेच त्यांची कोरोना चाचणीही करण्याची याठिकाणी व्यवस्था आहे. रुग्णालय कोरोनामुक्त राहावे यासाठी सर्व प्रयत्न केले जात असल्याचा दावा वैद्यकीय अधिक्षकांकडून केला जात असताना जिल्हा स्त्री रुग्णालयातील मुख्य परिचारिकेला कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच खळबळ उडाली आहेत.

author img

By

Published : Jul 27, 2020, 4:23 PM IST

corona-infection-in-5-people-at-district-general-womens-hospital-at-amravati
जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयावर कोरोनाचे सावट...

अमरावती - बाळाचा जन्म हा खरा तर आनंदोत्सव असतो. मात्र, कोरोनाच्या या संकट काळात जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात दाखल होणारी गर्भवती महिला आणि तिच्या नातेवाईकांसाठी हा कठीण काळ आहे. रुग्णालयात 5 गर्भवतींना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णालयाच्या मुख्य परिचरिकेलाही कोरोनाची लागण झाली आहे, तर सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या या रुग्णालयाची वास्तविकता गंभीर असून या वातावरणात नवजात बालकांची काळजी घेण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनासमोर आहे.

दीडशे खाटांची संख्या असणाऱ्या अमरावतीच्या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात बाराही महिने खाटांच्या संख्येपेक्षा तिप्पट, चौपट गर्भवती आणि बाळंतीण महिला दाखल असतात. आज सुद्धा हेच चित्र आहे. रुग्णालयातील सर्व वॉर्डमध्ये गर्दी आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम याठिकाणी पाळले जात नाहीत. जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अतिदुर्गम मेळघाटातील परिसर आणि जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या मध्यप्रदेशातून अनेक गर्भवती महिला अमरावतीत उपचारासाठी येतात.

ग्रामीण रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात महिलेचे बाळंतपण झाल्यानंतर काही गंभीर समस्या उद्भवल्यास त्यांना जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात दाखल केले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अशिक्षित कुटुंबातील महिलाच या रुग्णालयात मोठ्या संख्येने दाखल होतात. याठिकाणी गर्भवती, बाळंतीण महिला आणि बाळांची काळजी घेण्यासाठी डॉक्टर, परिचारिका यांचा एकूण 60 जणांचा स्टाफ आहे. यापैकी 35 जण हे कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालयात अनेक अडचणी आणि समस्या आहेत.

जिल्हा स्त्री रुग्णालयात कोरोना काळात खबरदारी म्हणून गर्भवती असणाऱ्या कोरोनाग्रस्त महिलांसाठी विषेश असे कक्ष निर्माण केले आहे. तिथे शस्त्रक्रियेचीही व्यवस्था आहे. याठिकाणी आजवर पाच कोरोनाबाधित महिलांनी बाळांना जन्म दिला असल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या वाठोडकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

रुग्णालयात दाखल महिलांना सर्दी, ताप, खोकला, अशी लक्षणे आढळली की त्यांना इतर वॉर्डमध्ये ठेवले जाते. तसेच त्यांची कोरोना चाचणीही करण्याची याठिकाणी व्यवस्था आहे. रुग्णालय कोरोनामुक्त राहावे यासाठी सर्व प्रयत्न केले जात असल्याचा दावा वैद्यकीय अधिक्षकांकडून केला जात असताना जिल्हा स्त्री रुग्णालयातील मुख्य परिचारिकेला कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच खळबळ उडाली आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे आता पाच दिवसांपूर्वी जिल्हा स्त्री रुग्णालयातील सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याने रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे.

कोरोनोच्या संकट काळात गरोदर महिलांनी स्वतःला अधिक जपावे तसेच घरच्यांनी तिची अधिक काळजी घ्यायला हवी. गर्भवती महिलांनी जास्तीत-जास्त घरात राहणे, तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, इतरांशी कमी भेटणे, घरातील इतर सदस्यांनीही अशी काळजी घेणे गरजेचे आहे. गर्भवती महिलांनी हिरव्या भाज्या, फळं खाल्ली पाहिजेत. तसचे भरपूर पाणी आणि झोप चांगली घेऊन व्यायाम आणि योग करणे आवश्यक असल्याचे डॉ. अंजली देशमुख यांनी सांगितले.

कोरोनाग्रस्त महिलेच्या गर्भात असणारे बाळ कोरोनासंक्रमित होत नाही. ते सुरक्षित असते. मात्र, बळाने जन्म घेताच कोरोना संक्रमित आईकडून बाळाला कोरोना होण्याची भीती असते. यामुळे कोरोनाग्रस्त आईपासून तिच्या बाळाला 14 दिवस वेगळे ठेवणे गरजेचे आहे. अशा बाळांना ब्रेस्ट फीडिंग पंपच्या सहाय्याने आईचे दूध दिले जाऊ शकते. कोरोनाबाधित आईचे दूध बाळासाठी अपायकारक नाही. तोंडाला मास्क लावून कोरोबाधित आई बाळाला दूध देऊ शकते. मात्र, बाळाला शक्यतो 14 दिवस करोनाबाबधित मातेने दूध देऊ नये, असेही डॉ. अंजली देशमुख यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकट काळात काळजी घेणे स्वतःला जपणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत अनेकजण सतत सल्ला देत असले तरी जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाचे चित्र आणि तिथली वास्तविकता गंभीर आहे.

जानेवारी महिन्यापासून जिल्हा स्त्री रुग्णालयात जन्म (इन बॉर्न) आणि मृत पाववलेल्या तसेच बाहेरुन इथे उपचारासाठी दाखल (आऊट बॉर्न) सर्वसामान्य बाळांची आकडेवारी
इन बॉर्न बेबी - 718
आऊट बोर्न बेबी - 298
इन बॉर्न डेथ - 55
आऊट बॉर्न डेथ - 34

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.