ETV Bharat / state

ग्रामीण भागात कोरोनाबाबत जनजागृतीसाठी 'ड्रीम' संस्थेचा पुढाकार - अमरावती कोरोना जनजागृती मोहीम

अमरावती शहरात वाढणारा कोरोनाचा संसर्ग जून महिन्यापासून संपूर्ण जिल्ह्यात पसरला. मांजरखेड या गावतही कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने मांजरखेड, बासलापूर या भागात सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या 'ड्रीम्स' संस्थेच्यावतीने कोरोनाबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली असून मास्कचा वापर, सोशल डिस्टनसिंग याबाबत जनजागृती करण्यात आली.

corona-awarenes-program-in-rural-area-of-amravati-by-dream-institute
ग्रामीण भागात कोरोनाबाबत जनजागृतीकरिता 'ड्रीम' या सेवाभावी संस्थेचा पुढाकार
author img

By

Published : Sep 27, 2020, 3:37 PM IST

अमरावती - कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले असताना या संसर्गाला आळा घालण्यासाठी विविध उपाय-योजना केल्या जात आहे. तिवसा शहरातील 'ड्रीम' या बहुद्देशीय संस्थेच्यावतीने ग्रामीण भागात कोरोनाविषयक जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. या संस्थेच्यावतीने चांदुर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड, बासलापूर या गावात गेल्या तीन महिन्यांपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत.

ग्रामीण भागात कोरोनाबाबत जनजागृतीकरिता 'ड्रीम' या सेवाभावी संस्थेचा पुढाकार

एप्रिल-मे महिन्यात अमरावती शहरात वाढणारा कोरोनाचा संसर्ग जून महिन्यापासून संपूर्ण जिल्ह्यात पसरला. ग्रामीण भागातही कोरोनाने अनेकांना ग्रस्त केले आहे. मांजरखेड या गावतही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान मांजरखेड आणि बासलापूर या भागात सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या 'ड्रीम' संस्थेने कोरोनाबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टनसिंग याबाबत जनजागृती करण्यात आली.

प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ड्रीम संस्थेच्यावतीने सलग 2 महिन्यांपासून एका दिवसआड ग्रामस्थांना आयुर्वेदिक काढा बनवून दिला जातो आहे. तसेच आयुष मंत्रालयाच्यावतीने प्रमाणित करण्यात आलेले औषध वितरित करण्यात येत आहे. मांजरखेडचे सरपंच दिलीप गुल्हाने, उपसरपंच किरण देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी सुद्धा या उपक्रमास प्रतिसाद दिला असून महिला बचत गट आणि युवकांच्या मदतीने कोरोनाचे संकट टाळता येवू शकते, असे 'ड्रीम' संस्थेचे अध्यक्ष गजानन काळे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. या उपक्रमात ज्योत्स्ना शिवणीकर, स्वप्नील शंभरकर, मनू वरठी, उज्वल ढगे, जया देशमुख आदींच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जातो आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.