ETV Bharat / state

चांदूर रेल्वे येथे काँग्रेस कार्यकर्ते अपक्ष उमेदवाराच्या बूथवर; विविध चर्चांना उधान - Independent candidate Kalbande Chandur

शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागात आज मतदान होत आहे. मात्र, जिल्ह्यातील चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथे महाविकास आघाडीत फूट पडली आहे. स्थानिक काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अपक्ष उमेदवार काळबांडे यांच्या बूथवर पाहावयास मिळाले. यामुळे शहरात विविध चर्चांना ऊत आले आहे.

Independent candidate campaign congress chandur
चांदूर रेल्वे येथे काँग्रेस कार्यकर्ते अपक्ष उमेदवाराच्या बूथवर
author img

By

Published : Dec 1, 2020, 6:25 PM IST

अमरावती - शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागात आज मतदान होत आहे. मात्र, जिल्ह्यातील चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे दिसून आले. काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एका अपक्ष उमेदवाराच्या बूथवर पाहावयास मिळाले. यामुळे शहरात विविध चर्चांना ऊत आले आहे.

माहिती देताना शिवसेनेचे प्रकाश मारोटकर

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक घोषित झाल्यानंतर काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीतर्फे उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली. श्रीकांत देशपांडे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र, चांदूर रेल्वेत महाविकास आघाडीच्या बूथवर फक्त शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारीच दिसून आले. येथे एकही काँग्रेस नेता, कार्यकर्ता आढळून आला नाही. हीच परिस्थिती नांदगाव खंडेश्वरमध्येसुद्धा दिसली. त्यामुळे, काँग्रेसतर्फे देशपांडे यांचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार काळबांडे यांचा प्रचार होत असल्याचा संशय शिवसेनेकडून व्यक्त होत आहे.

ज्याप्रमाणे शरद पवार यांनी शेखर भोयर यांना निलंबित केले, त्याचप्रमाणे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी केली आहे.

हेही वाचा - शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२० : मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.