अमरावती - काँग्रेसने आपल्या 51 उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. यामध्ये अमरावतीच्या तिवसा मतदार संघात आ. यशोमती ठाकूर आणि आ. विरेंद्र जगताप यांना चौथ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आ. यशोमती ठाकूर या मागील २ टर्ममध्ये तिवसा मतदार संघाच्या आमदार आहेत. यावेळी त्यांना हॅटट्रिकची संधी मिळविण्यासाठी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर, धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार वीरेंद्र जगताप हे सुद्धा मागच्या तीन टर्म पासून आमदार आहेत आणि आता चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. तसेच, मोदी लाटेतही या दोन्ही काँग्रेसच्या आमदारांनी आपला गढ शाबूत ठेवला आहे.
हेही वाचा - अमरावतीमध्ये अंबादेवीच्या अभिषेकाने नवरात्रोत्सवाला प्रारंभ...
मागील काळात केलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन यशोमती पुन्हा मैदानात आल्या आहेत. तर, ३ ऑक्टोबरला यशोमती आपले नामांकन दाखल करणार आहेत.