ETV Bharat / state

केंद्र सरकारच्या कायद्यांविरोधात तिवसा तहसील कार्यालयावर काँग्रेसचे आंदोलन - अमरावती आंदोलन बातम्या

केंद्र सरकारने केलेले कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. या कायद्यांमुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड संताप असून केंद्र सरकारने हे कायदे मागे घ्यावेत. कृषी उत्पन्न बाजार समिती मोडकळीस येण्याची भीती आहे.

अमरावती
अमरावती
author img

By

Published : Oct 7, 2020, 5:25 PM IST

अमरावती - केंद्र सरकारचा कृषी कायदा रद्द करावा, उत्तर प्रदेशमधील हाथरस बलात्कार घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी तिवसा तहसील कार्यालयावर तिवसा तालुका काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने केलेले कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. या कायद्यांमुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड संताप असून केंद्र सरकारने हे कायदे मागे घ्यावेत. कृषी उत्पन्न बाजार समिती मोडकळीस येण्याची भीती आहे. आतापर्यंत बाजार समिती व्यवस्थेमुळे राज्य सरकारला कर रूपाने मिळणारा महसूलही केंद्र सरकारने एकतर्फी निर्णय घेऊन मोडीस आणला आहे, असे म्हणत तिवसा तहसीलवर आंदोलन करत मोदी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा - अमरावतीच्या तिवस्यात ७५ वर्षीय आजीबाईंची कोरोनावर यशस्वी मात...

तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजल्यापासून निदर्शनासह एक दिवसीय आंदोलन यावेळी करण्यात आले. मागण्यांचे निवेदन तहसीलदार वैभव फरतारे यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष मुकुंद देशमुख, काँग्रेस नेते दिलीप काळबांडे, जिल्हा परिषद सभापती पूजा आमले, पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, तिवसा नगराध्यक्ष वैभव वानखडे, संजय देशमुख, सचिन गोरे, शरद वानखडे, कल्पना दिवे, प्रकाश माहोरे, रवींद्र हांडे, प्रदीप बोके, नगरसेवक नरेंद्र विघ्ने, दिवाकर भुरभुरे, अब्दुल सत्तार, अंकुश देशमुख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.