अमरावती - मेळघाटातील कुपोषण निर्मूलन, बालकांचे आरोग्य संरक्षण व संवर्धनासाठी जिल्हा ग्रामीण आरोग्यमंत्री द्वारे मेळघाटात झोन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर 'दक्षता पूर्व' हा कार्यक्रम राबवण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे मेळघाट आता बालकांची आरोग्य तपासणी सुरू झाली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध करावा. त्याचप्रमाणे कुपोषण निर्मूलन कार्यक्रमाची भरीव अंमलबजावणी व्हावी यासाठी मेळघाटात कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडून ही व्यापक मोहीम हाती घेतली आहे. झोन कार्यक्रमाच्या माध्यमातून ही तपासणी सुरू झाली आहे. पावसाळ्यानंतर हा कार्यक्रम हाती घेतला जातो.
झोन कार्यक्रमासाठी 76 पथके तैनात
मेळघाटात राबविण्यात येत असलेल्या या झोन कार्यक्रमासाठी 76 पथके तयार करण्यात आले आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी, मानसेवी वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचा समावेश या मोहिमेत करण्यात आला आहे.
मोहिमेत या कामाचा समावेश
झोन कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीमध्ये जाऊन वजन घेणे. नंतर त्या बालकांचे ग्रेडेशन ठरवून सॅम व मॅम बालकांचे सनियंत्रण व उपचार केले जाते. तसेच गरज पडल्यास त्या बालकांना केंद्रात भरती करण्याची गरज आहे अशा बालकांना वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानंतर उपचार मिळून दिले जातात. याचबरोबर उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालय येथून जिल्हा रुग्णालयात संदर्भ सेवाही दिली जाते.
गरोदर व स्तनदा माता तपासणी सुरू
या मोहिमेंतर्गत मातामृत्यू कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. कुपोषित असणाऱ्या बालकांची तपासणी कुष्ठरोग, क्षयरोग, मलेरिया, गलगंड सिकलसेल या आरोग्यविषयक कार्यक्रमाचे अंमलबजावणी या कार्यक्रमांमध्ये केली जाते.
हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी रात्रभर मुसळधार, चिपळूणमध्ये सखल भागात भरलं पाणी