अमरावती- जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथील फासे पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'प्रश्नचिन्ह' नावाची आदिवासी आश्रम शाळा सुरू केली आहे. आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही शाळा सुरू करण्यात आली. मात्र, या शाळेचा काही भाग समृद्धी महामार्गात जात असल्याने पाडण्यात आला. त्यामुळे विध्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिकावे लागत आहे.
हेही वाचा- निर्भया प्रकरण : दोषी अक्षय ठाकुरची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली
विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी शाळेची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांसोबत सवांद देखील साधला.