ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांनी मला भाजपात येण्यासाठी ऑफर देऊ केली - यशोमती ठाकूर

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून, तुम्हाला एवढे-एवढे देतो भाजपत या, अशी ऑफर दिली होती. मात्र, ती ऑफर आपण नाकारली', असा गौप्यस्फोट आमदार यशोमती ठाकूर यांनी केला.

आमदार यशोमती ठाकूर
author img

By

Published : Apr 2, 2019, 7:28 PM IST

अमरावती - 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून, तुम्हाला एवढे-एवढे देतो भाजपात या, अशी ऑफर दिली होती. मात्र, ती ऑफर आपण नाकारली', असा गौप्यस्फोट अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत त्यांनी हा आरोप केला.

सभेत बोलताना आमदार यशोमती ठाकूर

अमरावती मतदार संघातील लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या निवडणूक प्रचारार्थ तिवसा येथील जयश्री वानखडे सभागृहात सोमवारी रात्री सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केला. पैशासाठी राजकारण करत नसून विचारधारेला महत्त्व देत असल्याचे त्यांनी यावेली स्पष्ट केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांच्या विचारधारेवर चालत असल्याचे त्या म्हणाल्या.

आमदार रवी राणांसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. काँग्रेस पक्ष हा थोर महापुरुषांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे जातीवादी भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी मी अहोरात्र परिश्रम करीत आहे. मोदी सरकार फेकणारे सरकार आहे, खोटे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेत आले. मात्र, त्यांनी लोकांची दिशाभूल केली, अशी टीका त्यांनी भाजप सरकारवर केली. मोदी लाट ओसरली असून वर्ध्याच्या मोदी यांच्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवली. मी आघाडी धर्म पाळणार आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांना विजयी करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी नागरिकांना केले

नवनीत राणा काय बोलल्या...

शेतकरी बजेट व्हायला पाहिजे, युवकांना रोजगार मिळायला हवा. खासदार आनंदराव अडसूळ स्वतःला मतदान करू शकत नाही, ते काय अमरावती जिल्हाचा विकास करणार? असा टोला त्यांनी आनंदराव अडसूळ यांना लगावला. अडसूळ माजी खासदार झाले आहेत. त्यामुळे अडसूळ यांनी मला आशिर्वाद द्यावा. निवडणुकीपुरते खासदार जिल्हात असतात. बाकी दिवस गायब असतात, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.

Intro:मुख्यमंत्र्यांनी मला भाजपात यायला ऑफर दिली

काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव आमदार यशोमती ठाकूर यांचा गौप्यस्फोट

ही लोकसभा निवडणूक राहुल गांधी यांना साथ देण्याची आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाचे हात बळकट करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला तुम्हाला एवढे एवढे देतो तूम्ही भाजपात या अशी मला ऑफर दिली परंतु मी ती नाकारली असा गौप्यस्फोट अमरावती जिल्ह्यातील तिवस्याच्या प्रचार सभेत अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमतीं ठाकूर यांनी केला
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाई, स्वाभिमान शेतकरी संघटना व युवा स्वाभिमान पक्ष या मिळून पुरोगामी महाआघाडीच्या अधिकृत अमरावती लोकसभा निवडणूकीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या निवडणूक प्रचारार्थ तिवसा येथील जयश्री वानखडे सभागृहात सोमवारी रात्री सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी हा खळबळ जनक गौप्यस्फोट केला.यावेळी
अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा,आमदार रवी राणा सह आदी उपस्थित होते त्यावेळी यशोमती ठाकूर यांनी सार्वजनिक रित्या प्रचार सभेत सांगितले,काँग्रेस पक्ष हा थोर महापुरुषांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे त्यामुळे जातीवादी भाजपाला सत्तेपासून खेचन्यासाठी मी अहोरात्र परिश्रम करीत आहे मोदी सरकार फेकणारे सरकार आहे,खोटे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेवर आले मात्र दिशाभूल सरकारने केली यावेळी यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली,मोदी लाट ओसरली असून वर्ध्याच्या नरेंद्र मोदी यांच्या सभेत लोकांनी पाठ फिरवली आहे मी आघाडी धर्म पाळणार त्यामुळे सर्वांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे अस आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले

नवनीत राणा काय बोलल्या...

शेतकरी बजेट व्हायला पाहिजे,शेतकरी,शेतमजूर,बेरोजगार युवक यांना रोजगार नाही,मुंबईचे खासदार आनंदराव अडसूळ स्वतःला मतदान करू शकत नाही ते काय करणार अमरावती जिल्हाचा विकास?आनंदराव अडसूळ माजी खासदार झाले आहे त्यामुळे मला अडसूळ यांनी आशीवाद द्यावा मी जिल्हाची सून आहे ब्यग उचला अन चालते व्हा,मी स्वतः कार्यकर्ती आहे त्यामुळे सर्वांना मान सन्मान मिळतो निवडणूक पुरते खासदार जिल्हात असतात बाकी दिवस गायब असतात असे उमेदवार नवनीत राणा यांनी सांगितलेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.