ETV Bharat / state

अमरावती : वातावरणातील बदलामुळे पपईवर रोगाचा प्रादुर्भाव

author img

By

Published : Dec 19, 2020, 3:36 PM IST

Updated : Dec 19, 2020, 5:59 PM IST

पपई पिकावर अज्ञात रोगाचा मारा दिसून येत आहे. त्यामुळे पपईची वाढ खुंटते आहे. पपई झाडावरच सडते आहे. त्यामुळे पपई उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. त्याला योग्य त्या मार्गदर्शनाची गरज आहे.

papaya
पपई

अमरावती - मागील काही दिवसांपासून विदर्भात ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तर खरीप हंगामातील तूर पिकाच्या जबर फटका बसला आहे. मात्र, यानंतर आता फळबागालाही या वातावरणाचा फटका बसला आहे. या ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील पपई बागेचेही मोठे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्याची प्रतिक्रिया.

जिल्ह्यातील अचलपूर, परतवाडा, अंजनगाव, धामणगाव या परिसरात पपई पिकाची मोठी लागवड आहे. मात्र, अचानक वातावरणातील झालेल्या बदलामुळे पपई पीक धोक्यात आले आहे.

पपईवर अज्ञात रोगांचा मारा

पपई पिकावर अज्ञात रोगाचा मारा दिसून येत आहे. त्यामुळे पपईची वाढ खुंटते आहे. पपई झाडावरच सडते आहे. त्यामुळे पपई उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. त्याला योग्य त्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे कृषी विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देणार का? हाही प्रश्न आहे.

हेही वाचा - मराठा आरक्षणासंदर्भात भाजपा सरकारने केलेल्या वकिलांच्या नियुक्त्या संशयास्पद; माहिती अधिकारात बाब उघड

आधी परतीच्या पावसाने नुकसान -

यंदा ऑक्टोबर महिन्यात आलेल्या सातत्याने परतीच्या पावसाने तुर, सोयाबीन, कापूस या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यातच पपई संत्रा पिकाला येता जबर फटका बसला आहे. त्यात मागील काही दिवसांपासून विदर्भात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पुन्हा एकदा पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे.

Last Updated : Dec 19, 2020, 5:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.