अमरावती: सोमवारी सायंकाळी लखाड गावात मज्जिद जवळ १३ ते १४ वर्षीय मुलांमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला होता. त्या वादात दोन समाजातील काही लोक जमा झाले व वाद निर्माण झाला. सदर वादाचे रूपांतर हाणामारीत सुरू झाले. दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. लखाड येथे दगडफेक सुद्धा झाली होती. घटनास्थळी मोठा जमाव निर्माण झाला होता. सदर घटनेची पोलिसांना मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. लखाड एका युवकास ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तर लखाड गावात प्रचंड पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गावात झेंड्याचा वाद: गत काही दिवसापासून लखाड गावात झेंड्याचा वाद सुरू आहे. झेंड्यावरून यापूर्वी देखील गावात तणाव निर्माण झाला होता. सोमवारी लहान मुलांच्या किरकोळ वादाने दोन समुदाय एकमेकांविराधात उभे ठाकल्याने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान गावात सतत होणाऱ्या अशा प्रकरणाची कसून चौकशी होणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे. सोमवारी रात्रभर गावात संचारबंदी सदृष्य परिस्थिती होती. दरम्याम अंजनगाव सुर्जी हे संवेदनशील शहर असून या घटनेचे पडसाद अंजनगाव सुर्जीसह तालुक्यात इतर भगत उमटू नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत.
दोन गटात दगडफेक: नंदुरबारमध्ये किरकोळ वादातून दोन गटात दगडफेक झाली होती. शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली होती. या दंगलीत काचेच्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. रात्री पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला असून जुन्या वादातून दोन गटात ही तुफान दगडफेक झाली असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान दंगलीत 2 अधिकाऱ्यांसह 2 ते 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी सुमारे पंधरा ते वीस संशयतांना अटक करण्यात आली होते. तर ही घटना मध्यरात्री सुमारे साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली होती.