ETV Bharat / state

कुत्र्यांच्या तावडीतून नागरिकांनी केली हरणाची सुटका - अमरावती बातमी

जंगलातून वाड चुकून एक हरिण लोकवस्तीत शिरले होते. त्या हरणाच्या मागे कुत्रे लागले. त्या कुत्र्यांच्या तावडीतून त्या हरणाची सुखरुप सुटक करुन नागरिकांनी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

deer
हरिण
author img

By

Published : Jul 1, 2020, 4:27 PM IST

अमरावती - जंगलातून वाट चुकून गावाकडे आलेल्या एका हरणाच्या मागे काही कुत्री लागली होती. त्या कुत्र्यांच्या तावडीतून हरणाची सुटका करण्यात गावकऱ्यांना यश आले आहे.

हरिण

बुधवारी (दि. 1 जुलै) सकाळच्या सुमारास अमरावतीच्या शिरजगाव मोझरी परिसरात असलेल्या जंगलातील एक हरिण गावात शिरल्याने त्याच्या मागे कुत्रे लागले होते. दरम्यान, गावकऱ्यांच्या सतर्कतने या हरणाला कुत्र्यांच्या तावडीतून वाचवण्यात यश आले असून हे हरिण वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वन विभागाकडून हरणाची तपासणी केली जाणार असून काही दुखापत असल्यास त्याच्यावर उपचार करुन त्याला पुन्हा जंगल अधिवासात सोडण्यात येणार आहे.

हेही वाचा - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांना वाघाचे दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.