ETV Bharat / state

बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग 1 मे 2021 मध्ये वाहतूकीसाठी खुला होणार, मुख्यमंत्री ठाकरेंची माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समृद्धी महामार्गावर पाहणी दौरा सुरू झाला आहे. यावेळी त्यांच्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री यशोमती ठाकूर, वन मंत्री संजय राठोड उपस्थित आहेत. समृद्धी महामार्ग महत्वाचा प्रकल्प असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) कडून हा प्रकल्प राबविला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Dec 5, 2020, 12:06 PM IST

Updated : Dec 5, 2020, 12:44 PM IST

अमरावती - बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या महामार्गाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चांगल्या दर्जाचं काम होत आहे. कोरोना काळातही समृद्धी महारार्गाचं काम सुरु होतं. येत्या 1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु होईल असे त्यांनी जाहीर केले तर मे 2022 पर्यंत मुंबईपर्यंत महामार्ग सुरु होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री यशोमती ठाकूर, वन मंत्री संजय राठोड उपस्थित होते. समृद्धी महामार्ग महत्वाचा प्रकल्प असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) कडून हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते नागपूर हे 700 किमीचे अंतर काही तासात सहज पार करता येणार आहे. हा प्रकल्प राज्य सरकारसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु...

कसा असले मुख्यमंत्र्यांचा दौरा?

  • सकाळी 10.20 वाजता मुंबईहून विमानाने नागपूर विमानतळ येथे आगमन.
  • हेलिकॉप्टरमधून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांदेश्वर येथील शिवणी रसुलापूर , मौजे देऊळगव्हाण हेलिपॅड येथे प्रयाण
  • 11.15 वाजता मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव
  • दुपारी 12.15 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवडीकडे प्रयाण.
  • दुपारी 2 वाजता गोळवडी हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव.
  • दुपारी 3.10 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण. औरंगाबाद येथे आगमन व 3.35 वाजता विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समृद्धी महामार्ग पाहणी दौरा

१२ जिल्ह्यातून जाणारा महामार्ग -

समृद्धी महामार्ग मुख्य १२ जिल्ह्यांतून जातो. नागपुर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. अप्रत्यक्षपणे काही जिल्हे चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड यांनाही जलद वाहतुकीचा फायदा होणार आहे. जवळपास २६ तालुके व ३९२ गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे हे समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करणार आहे.

समृद्धी महामार्ग महत्वाचा प्रकल्प

कोरोना-टाळेबंदीचा प्रकल्पाच्या कामाला फटका -

समृद्धी महामार्गाचे काम वेगात सुरू होते. मोठ्या संख्येने मजूर आणि इतर कर्मचारी वर्ग काम वेगात पुढे नेत होते. मात्र, मार्चमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रार्दुभाव सुरू झाला. त्यानंतर टाळेबंदी घोषित केल्याने मुंबई, ठाणे आणि अन्य जिल्ह्यातील कामावर काही प्रमाणात परिणाम झाला. मोठ्या संख्येने स्थलांतरीत मजूर काम सोडून गावी गेले. याचाही महामार्गाच्या कामाला मोठा फटका बसला.

Last Updated : Dec 5, 2020, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.