ETV Bharat / state

अमरावती : कोरोनामुळे पोल्ट्री व्यावसायिकांनी चक्क फुकट वाटल्या कोंबड्या

author img

By

Published : Mar 17, 2020, 1:55 PM IST

कोरोना संसर्गाच्या भीतीने पोल्ट्री फार्म व्यवसाय डबघाईस आला आहे. पोल्ट्री फार्म व्यावसायिकांच्या अडचणी संदर्भात निवेदन सादर केले. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना आर्थिक मदत मिळावी तसेच त्यांचे मालमत्ता कर माफ व्हावा. या मागणीसाठी जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोल्ट्री व्यावसायिकांनी अंडी आणि कोंबडी फुकटात वाटली.

अमरावती कोंबड्यांचे फुकट वाटप
अमरावती कोंबड्यांचे फुकट वाटप

अमरावती - कोरोनामुळे डबघाईस आलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांनी आज(मंगळवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंडी आणि कोंबड्यांचे फुकट वाटप केले.

अमरावती कोंबड्यांचे फुकट वाटप

कोंबडी आणि अंडी खाल्ल्यामुळे कोरोना होतो, या धास्तीमुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पोल्ट्री व्यवसाय डबघाईस आला आहे. धुळवडीच्या दिवशी कोंबडीला मागणी नसल्यामुळे कोंबडी व्यवसाय मेताकुटीस आले आहेत. पोल्ट्री व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला असून पोल्ट्री व्यवसायिकांना आर्थिक मदत मिळावी तसेच त्यांचे मालमत्ता कर माफ व्हावा. या मागणीसाठी जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायिक आज माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

हेही वाचा - कोरोना : मेळघाटातील पर्यटन ३१ मार्चपर्यंत बंद; पर्यटकांची गर्दी ओसरली, व्यवसायावर परिणाम

जिल्हाधिकाऱ्यांना पोल्ट्री फार्म व्यावसायिकांच्या अडचणी संदर्भात निवेदन सादर केले. यानंतर, डॉ. अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोल्ट्री व्यावसायिकांनी अंडी आणि कोंबडी फुकटात वाटली. कोरोना हा कोंबडी किंवा अंडी खाल्ल्याने होत नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन यावेळी डॉ. अनिल बोंडे यांनी केले.

हेही वाचा - फासेपारधी समाजाचा समृद्धी महामार्गावर विविध मागण्यांसाठी ठिय्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.