अमरावती- दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाची आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर वायरल करणाऱ्या दोघाजणांविरुद्ध अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी शहरातील राधानगर परिसरात राहतात. मधुकर उमेकर आणि भाजपचे माजी नगरसेवक गोपाल गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत.
काय म्हटले सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये- शहरातील गांधी चौक परिसरात 500 ते 1000 च्या संख्येत एका विशिष्ट समुदायाचे युवक गाड्यांची तोडफोड करत आहे. विशिष्ट स्वरूपाच्या घोषणा देत असून त्यांच्या हातात काँग्रेसचा झेंडा आहे. या पोस्ट सोबतच एक व्हिडिओ देखील दोन्ही आरोपींनी सोशल मीडियावर पोस्ट केला. गाडगे नगर पोलिसांना याबाबत माहिती मिळतात त्यांनी राधानगर परिसरातील मधुकर उमेकर यांचा मोबाईल तपासला. त्यांना ही आक्षेपार्ह पोस्ट गोपाल गुप्ता यांनी अपलोड केल्याचे लक्षात येते. त्यानंतर पोलिसांनी मधुकर उमेकर आणि गोपाल गुप्ता या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अकोल्यातील दंगलीमुळे अमरावतीत अलर्ट- अकोला शहरात उसळलेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात पोलिसांनी अलर्ट जाहीर केला आहे. सोशल मीडियावर कोणीही चुकीची माहिती पसरवू नये असे आवाहन पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या वतीने करण्यात आले आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या ग्रुप ॲडमिन आणि अकाउंट धारकांना याबाबत समज देण्यात येत आहे. अमरावती शहरात कुठल्याही प्रकारे सोशल मीडियावरील पोस्टमुळे तणाव निर्माण होणार नाही, याची खबरदारी पोलिसांच्यावतीने घेतली जात आहे.
अकोल्यासह शेवगामध्ये हिंसाचार घडला- अकोल्यात द लव्ह स्टोरीवरील सोशल मीडियातील पोस्टमुळे दोन गटात जोरदार दगडफेक झाली. या प्रकरणात निष्पाप नागरिकाचा बळी गेला आहे. पोलिसांनी 102 जणांवर गुन्हा दाखल केला असून सुमारे 31 जणांना ताब्यात घेतले. अकोल्यात संचारबंदीमुळे जनजीवन विस्कळित झाले. दुसरीकडे अफवा पसरू नये, याकरिता इंटरनेटही बंद करण्यात आले. अकोल्यात आज संचाबंदीचे नियम शिथील केल्याने बाजारपेठेत गर्दी झाली. दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये दोन गटात छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुकीदरम्यान वाद झाला. या वादानंतर पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही शांततेची स्थिती आहे. मात्र शेवगावमधील घटनेप्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांमधून मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा-
Pradeep Kurulkar News: डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांची पोलिग्राफ टेस्ट होणार
Kolhapur Crime News : दारुच्या नशेत पित्याचा खून करून मुलाची आत्महत्या
Camel Herd: तीन राज्यांच्या पोलीस एस्कॉटमध्ये 146 उंटांचा कळप नाशिकमधून मायभूमी परतणार