अमरावती : राज्यात आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या सुरू असलेला संघर्ष विकोपाला गेला आहे. अचलपूरचे आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा ( MLA Ravi rana ) यांच्या विरोधात वक्तव्य करताना त्यांनी त्यांच्या पत्नी आणि आईचा अपमान केला असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत महिला मुक्ती आघाडीच्या वतीने बच्चू कडू यांच्या विरोधात तक्रार देण्यात ( FIR against Former State Minister Bachu Kadu )आली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
आमदार बच्चू कडू यांच्यावर आरोप - महिला मुक्ती आघाडीच्या वतीने बच्चू कडू यांच्यावर आरोप केले आहे की, आमदार बच्चू कडू हे संविधानाचे भान ठेवता, बेजबाबदार पणाने वागत आहेत. शासकीय कार्यालयात जाऊन अनेक कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे व त्यांच्यावर हात उगारणे हा त्यांचा नेहमीचाच धंदा झाला आहे. आमदार हा कर्मचाऱ्यांवर हात उभारत असेल तर तो अकार्यक्षम आहे हे यातून स्पष्ट होते, असे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आमदार बच्चू कडू एमबीबीएस डॉक्टर ? - एखाद्या आमदाराला हिजडा घोषित करणारे, बच्चू कडू हे एमबीबीएस किंवा एमडी डिग्री घेतलेले डॉक्टर आहेत का ? आमदार रवी राणा त्यांच्या विरोधात बच्चू कडू यांनी हे जे वक्तव्य केले आहे, त्यामुळे त्यांच्या पत्ती खासदार नवनीत राणा ( MP Navneet rana ) आणि आईबाबत अभद्र भाषा वापरून त्यांचा अपमान केला आहे. तृतीयपंथीयांचा देखील बच्चू कडू यांनी अपमान केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात करीत गुन्हा दाखल करावा, तसेच आम्ही महाराष्ट्रातील सर्वच पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रारी देऊ, असा इशारा महिला मुक्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक खरात ,गीता वाघ, किशोर गोरडे, पुरुषोत्तम कडू,बाळू इंगळे, वैशाली पिऊ लकर आदींनी दिला आहे.