ETV Bharat / state

'अमरावती जिल्ह्यात साकारणार कौशल्य विद्यापीठ'

मोझरी येथे सायन्स पार्कची निर्मिती व्हावी, यासाठी मी प्रयत्न केले होते. मात्र, सायन्स पार्कऐवजी कौशल्य विद्यापीठ स्थापन करणे सोयीचे आहे, असे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आले, यानंतर मी कौशल्य विद्यापीठासंदर्भात संपूर्ण प्रस्ताव पाठवला होता.

yashomati thakur spoke with mediaZ
यशोमती ठाकूर, कॅबिनेट मंत्री
author img

By

Published : Jan 4, 2020, 2:51 AM IST

अमरावती - 'अध्यात्म और विज्ञान से हो संसार का भला', असा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिला होता. म्हणून त्यांच्या स्वप्नातील समाज घडविण्यासाठी जिल्ह्यातील मोझरी येथे कौशल्य विद्यापीठ स्थापन केले जाणार असल्याची माहिती राज्याच्या कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. तसेच या विद्यापीठासंदर्भात मागच्या सरकारच्या काळातच मी प्रस्ताव सादर केला असल्याचेही त्या म्हणाल्या. राज्याच्या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ठाकूर शुक्रवारी पहिल्यांदाच अमरावतीत आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानासह विविध कामासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यशोमती ठाकूर, कॅबिनेट मंत्री

नामदार ठाकूर पुढे म्हणाल्या, मोझरी येथे सायन्स पार्कची निर्मिती व्हावी, यासाठी मी प्रयत्न केले होते. मात्र, सायन्स पार्कऐवजी कौशल्य विद्यापीठ स्थापन करणे सोयीचे आहे, असे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आले, यानंतर मी कौशल्य विद्यापीठासंदर्भात संपूर्ण प्रस्ताव पाठवला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अध्यात्म सोबतच विज्ञानाची सांगड असणे समाजाच्या हिताचे असल्याचा उपदेश दिला. मोझरी येथे अध्यात्माचे वातावरण आहे. म्हणून अध्यात्म सोबतच विज्ञानाची सांगड घालता यावी, यासाठी कौशल्य विद्यापीठाची निर्मिती केली जाणार आहे. आमच्या भागातील मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होऊन त्यांच्या अंगी कौशल्य विकास व्हावा. हा कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यामागचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - 'जळगावमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला चालू देणार नाही'

मंत्री म्हणून शपथ घेतल्यावर सर्वात आधी मनात समाजातील दारिद्र्य दूर व्हावे हाच विचार आला. श्रीमंती आणि गरिबी अशी मोठी दरी समाजामध्ये आहे. ही दरी कमी होऊन समाजातील दारिद्र्य दूर व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही ठाकूर म्हणाल्या.

Intro:'अध्यात्म और विज्ञान से हो संसार का भला'. असा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्वप्नातील समाज घडविण्यासाठी अमरावती जिल्ह्यात मोझरी येथे कौशल्य विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. या विद्यापीठासंदर्भात मागच्या सरकारच्या काळातच मी प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज दिली.

Body:महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री म्हणून यशोमती ठाकूर आज पहिल्यांदाच अमरावतीत आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानासह विविध कामासंदर्भात आढावा बैठक घेण्यापूर्वी ना. यशोमती ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ना. यशोमती ठाकूर म्हणाल्या,मोझरी येथे सायन्स पार्कची निर्मिती व्हावी यासाठी मी प्रयत्न केले होते. मात्र सायन्स पार्क ऐवजी कौशल्य विद्यापीठ मोझरी येथे स्थापन करणे सोयीचे आहे असे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आल्यावर मी कौशल्य विद्यापीठासंदर्भात संपूर्ण प्रस्ताव पाठवला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अध्यात्म सोबतच विज्ञानाची सांगड असणे समाजाच्या हिताचे असल्याचा उपदेश दिला. मोझरी येथे अध्यात्माचे वातावरण असून अध्यात्म सोबतच विज्ञानाची सांगड घालता यावी यासाठी कौशल्य विद्यापीठाची निर्मिती केली जाणार आहे. आमच्या भागातील मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होऊन त्यांच्या अंगी कौशल्य विकास व्हावा. हा कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यामागचा उद्देश असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
मंत्री म्हणून शपथ घेतल्यावर सर्वात आधी मनात समाजातील दारिद्र्य दूर व्हावे हाच विचार आला. श्रीमंती आणि गरिबी अशी मोठी दरी समाजामध्ये असून ही दरी कमी होऊन समाजातील दारिद्र्य दूर व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.