अमरावती - संभाव्य कोरोना रुग्ण म्हणून घरातील सर्व सदस्य विलगीकरण कक्षात असताना चोरट्यांनी त्यांचे घर फोडून घरातील दागिने आदी वस्तू चोरून नेल्या. कोरोनामुळे प्रतिबंधित क्षेत्र घोषित असणाऱ्या अमरावती शहरातील मासानगंज परिसरात हा प्रकार घडला.
अमरावतीत कुटंब विलगीकरण कक्षात असताना चोरट्यांनी फोडले घर अमरावतीत कुटंब विलगीकरण कक्षात असताना चोरट्यांनी फोडले घर मासांगनज परिसरात काही जण कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आल्याने हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित आहे. दिवसभर या भागात सर्व काही बंद असल्याने शांतता आहे. अतिशय गजबजलेला परिसर असणाऱ्या या भागात चक्क संभाव्य कोरोना रुग्ण म्हणून जे संपूर्ण कुटुंब 10 दिवसंपासून विलगीकरण कक्षात होते, त्यांचे घर फोडून चोरट्यांनी दागिन्यांसाह सुमारे 84 हजार रुपायांचा ऐवज लंपास केला. आज सकाळी शेजारच्यांना मागच्या बाजूने घरात कुणी शिरल्याचे लक्षात येताच त्यांनी नागपुरी गेट पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. श्वान पथकही घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, चोरट्यांचा शोध लागू शकला नाही. दरम्यान, या घरातील सदस्य दुपारी 10 दिवसांनंतर विलगीकरण कक्षातून घरी आले. कोरोनाच्या संकटासोबतच हे कुटुंब घरफोडीमुळे चांगलेच धास्तावले.