ETV Bharat / state

अमरावतीच्या नमुना परिसरातील ३ मजली इमारत कोसळली, जीवितहानी नाही

अमरावती शहरातील नमुना परिसरात जीर्ण झालेली ३ मजली इमारत शुक्रवारी रात्री कोसळली. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे मात्र नमुना परिसरात खळबळ उडाली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

author img

By

Published : Aug 17, 2019, 2:29 AM IST

Updated : Aug 17, 2019, 7:27 AM IST

अमरावतीच्या नमुना परिसरातील ३ मजली इमारत कोसळली, जीवितहानी नाही

अमरावती - शहरातील नमुना परिसरात जीर्ण झालेली ३ मजली इमारत शुक्रवारी रात्री कोसळली. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे मात्र नमुना परिसरात खळबळ उडाली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

शहरातील नमुना परिसरातील तीन मजली इमारतीत फक्त आटा चक्की होती. जुनी असणारी ही इमारत जीर्ण व मोडकळीस आली होती. शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळल्याने खळबळ उडाली. ही इमारत प्रकाश लुंगीकर यांच्या कपडे प्रेस करण्याच्या दुकानावर कोसळल्याने लुंगीकर यांच्या दुकानातील वॉशिंग मशीनसह इतर साहित्यांचे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अजय सारस्कार आणि लवलीना हर्षे घटनास्थळी धावून आले. त्यानंतर महापालिकेचे आपत्ती निवारण पथक, अग्निशामक दल आणि शहर कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस पथक नमुना परिसरात दाखल झाले. यानंतर परिसरात कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा काढण्याचे काम महापालिका प्रशासनाने झपाट्याने हाती घेतले आहे, तर शहरातील जीर्ण व मोडकडीस आलेल्या इमारती त्वरित खाली कराव्यात, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Intro:( विडिओ मेलवर पाठवला)
अमरावतीच्या नमुना परिसरात जीर्ण झालेली तीन मजली इमारत शुक्रवारी रात्री कोसळली. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. या घटनेमुळे मात्र नमुना परिसरात खलबळ उडाली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Body:नमुना परिसतर तीन मजली शिकस्त इमारतीत फक्त आटा चक्की होती. जुनी असणारी ही इमारत शिकस्त झाली होती. शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळल्याने खळबळ उडाली. ही इमारत प्रकाश लुंगीकर यांच्या कपडे प्रेस करण्याच्या दुकानावर कोसळल्याने लूमगिकर यांच्या दुकानातील वॉशिंगमशिनसह इतर साहित्यांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच परिसराचे माग्रेसएवक अजय सारस्कार आणि लावलीना हर्षे घटनास्थळी धावून आलेत. महापालिकेचे आपत्ती निवारण पथक, अग्निशामक दल आणि शहर कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस पथक नमुना परिसरात दाखल झाले. परिसरात कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा काढण्याचे काम महापालिका प्रशासनाने झपाट्याने हाती घेतले. शहरातील शिकस्त इमारती त्वरित खाली कराव्यात असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Conclusion:
Last Updated : Aug 17, 2019, 7:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.