ETV Bharat / state

अमरावतीमधील सूर्यगंगा नदीवरील पर्यायी पूल पुरात गेला वाहून..

शेंदुरजना बाजार येथील सूर्यगंगा नदीवर पुलाचे बांधकाम सुरू असून वाहतूकीसाठी केलेला पर्यायी पूल शनिवारी रात्री पडलेल्या पहिल्याच पावसाच्या पुराने वाहून गेला. त्यामुळे मार्गावरील जड वाहतूक ठप्प पडली आहे.

author img

By

Published : Jun 30, 2019, 9:13 PM IST

Updated : Jun 30, 2019, 9:48 PM IST

पूल पुरात वाहून गेला

अमरावती - तिवसा तालुक्यातील शेंदुरजना बाजार येथे सूर्यगंगा नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. परंतू वाहतुकीसाठी केलेला पर्यायी पूल शनिवारी रात्री पडलेल्या पहिल्याच पावसाच्या पुराने वाहून गेला. त्यामुळे मार्गावरील जड वाहतूक ठप्प पडली आहे.

पूल पुरात वाहून गेला

सुर्यगंगा नदीवरील केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत उंच पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे जुना लहान पूल पाडून त्याजागी नवीन उंच पूल बांधण्याचे काम गेल्या 8 महिन्यापासून सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी एक पर्यायी पूल बांधण्यात आला. मात्र तिवसा तालुक्यात शनिवारी मुसळधार पाऊस पडल्याने सुर्यगंगा नदीला पूर आला. त्यामुळे पर्यायी बांधलेला पुला खचून गेला.

पुलाचे बांधकाम सुरू असल्याने कंत्राटदाराने हा पर्यायी पूल निकृष्ट दर्जाचा बनविल्यामुळे पहील्याच पुरात वाहून गेला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे अनेक गावातील संपर्क तुटला आहे. तिवसा बांधकाम विभागाचे सदर बांधकामावर दुर्लक्ष असल्याने कंत्राटदाराने जुन्या पुलामधील काढलेला लोहा सरळ करून नविन पुलामध्ये वापरला आहे. त्यामुळे नविन पुल सुद्धा धोकादायक ठरू शकतो. यापुलाच्या बांधकामावर बांधकाम विभागाचे पुर्णत: दुर्लक्ष आहे.

पुलाचे बांधकाम नित्कृष्ठ दर्जाचे होत असल्याने येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सध्या खचलेला पूल दुरुस्ती करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा रस्ता तिवसा - चांदुर रेल्वे राज्यमहामार्ग आहे. त्यामुळे या पुलावरून दररोज शेकडो वाहन धावतात. मात्र पुरामुळे पूल खचल्याने वाहतुकीसाठी अडचण निर्माण झाली आहे.

Intro:
अमरावतीच्या शेंदूरजना बाजार येथील सूर्यगंगा नदीचा पर्यायी पूल पुरात वाहून गेला
निकृष्ट दर्जाचे काम,जड वाहतूक बंद

अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदुरजना बाजार येथे उंच पुलाचे बांधकाम सुरू असून वाहतूकीसाठी केलेला पर्यायी पूल शनिवारी रात्री पडलेल्या पहिल्याच पावसाच्या पुराने वाहून गेल्याने या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे, मात्र नवीन पूल बांधून तयार होणास वर्ष भराचा कालावधी लागणार असल्याने पर्यायी पूल निकृष्ट दर्जाचा बांधला असल्याने आता येथे मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे
येथील सुर्यगंगा नदीवरील उंच पुलाचे बांधकाम विशेष प्रकल्प विभाग केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सुरू आहे,त्यामुळे जुना लहान पूल पाडून हा पूल उंच बांधण्याचे काम गेल्या 8 महिन्यापासून सुरू आहे, त्यामुळे वाहतुकीसाठी त्या बाजूला एक पर्यायी पूल बांधण्यात आला आहे, मात्र तिवसा तालुक्यात शनिवारी मुसळधार पाऊस पडल्याने या सुर्यगंगा नदीला पूर आला होता,त्यामुळे पर्यायी बांधलेल्या पुलावर पुराचे पाणी गेल्याने रात्रीच हा पूल खचून गेला आहे,तर या पुलाला पाण्याने कोरपून गेले आहे, पुलाचे बांधकाम सुरू असल्याने कत्राटदार यांनी पर्यायी पुल हा निकृष्ट दर्जाचा बनविल्यामुळे पहील्याच पुरात वाहून गेला त्यामुळे गावातील संपर्क तुटला आहे, तिवसा बांधकाम विभाग यांचे कामावर दुर्लक्ष असल्याकारणाने कंत्राटदार यांनी जुन्या पुलामधील काढलेला लोहा सरळ करून नविन पुलामध्ये वापरला आहे त्यामुळे नविन पुल सुद्धा धोकादायक ठरू शकतो.यापुलाचे बांधकामावर बांधकाम विभागाचे पुर्णत: दुर्लक्ष आहे.त्यामुळे पुलाचे बांधकाम नित्कृष्ठ दर्जाचे होत असल्याकारणाने येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे,सध्या खचलेला पूल दुरुस्ती करण्याचे युद्ध स्तरावर काम सुरू असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, हा रस्ता तिवसा चांदुर रेल्वे राज्य महामार्ग आहे,त्यामुळे या पुलावरून दररोज शेकडो वाहन धावतात मात्र पूल पुराने खचल्याने वाहतूकीसाठी हा पूल आता धोकादायक वळणावर आहे,Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jun 30, 2019, 9:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.