ETV Bharat / state

नववधू म्हणते.. मला आशीर्वाद देण्यापेक्षा किमान एक झाड लावा

तिवसा येथील नववधू आपल्या लग्न सोहळ्यात पाच वृक्ष सासरी घेऊन गेली आहे. तिने आपल्या लग्नातील वऱ्हाड्यांना मला आशीर्वाद देण्यापेक्षा किमान एक झाड लावा, असा संदेश दिला आहे.

नववधू म्हणते.. मला आशीर्वाद देण्यापेक्षा किमान एक झाड लावा
author img

By

Published : Jun 13, 2019, 6:58 PM IST

अमरावती - विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण असतो. हा सोहळा अविस्मरणीय ठरावा याकरिता लग्न सोहळ्यात काही तरी हटके करण्याचा सगळेच जण प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न एका तरुणीने आपल्या लग्नात केला आहे.तिवसा येथील नववधू आपल्या लग्न सोहळ्यात पाच वृक्ष सासरी घेऊन गेली आहे. तिने आपल्या लग्नातील वऱ्हाड्यांना मला आशीर्वाद देण्यापेक्षा किमान एक झाड लावा, असा संदेश दिला आहे.

अमरावतीच्या एका मंगल कार्यालयात नीलिमा शंकरराव लाडिस्कर रा. तिवसा या तरुणीचा विवाह सोहळा हिंगनघाटच्या सीतेज मानकर यांच्याशी झाला आहे. नीलिमा लाडिस्कर ही नववधूने आपल्या माहेरमधून पाच वृक्ष आपल्या सासरी घेऊन गेली आहे.

नववधू म्हणते.. मला आशीर्वाद देण्यापेक्षा किमान एक झाड लावा

ही झाडे ती आपल्या सासरच्या घरी व परिसरात लावणार आहे. दरम्यान, दुष्काळ परिस्थितीत राज्य दुष्काळ मुक्त झाला पाहिजे, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे.

दिवसेंदिवस वृक्षांची तोड होत आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ नये, यासाठी झाडांची लागवड करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी स्वता:पासून सुरुवात करत माझ्या लग्नातील पाहुण्यांना झाडे लावण्याचा संदेश दिला आहे, असे मत निलिमा लाडिस्कर या नववधूने व्यक्त केले.

Intro:नवरी सासरी घेऊन गेली पाच वृक्ष
लग्न समारंभात उपक्रम,वृक्षारोपनाचा संदेश

अमरावती अँकर

विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण असतो. हा सोहळा अविस्मरणीय ठरावा याकरिता लग्न सोहळ्यात काही तरी हटके प्रयत्न होतात.असाच प्रयत्न एका तरुणीने आपल्या लग्नात केला,पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावण्यासाठी सरकारतर्फे वृक्षालागवड योजना राबविल्या जातात मात्र यात लोकसहभाग सुद्धा महत्त्वाचा असून तिवसा येथील नववधूने आपल्या लग्न सोहळ्यात पाच वृक्ष सासरी घेऊन गेली असून तिने आपल्या लग्नातील वऱ्हाड्यांंना मला आशीर्वाद दिल्यापेक्षा आपण किमान एक तरी झाड लावा असा संदेश एका नवविवाहित तरुणीने दिला
नीलिमा शंकरराव लाडिस्कर रा.तिवसा या तरुणीचा विवाह सोहळा आज अमरावतीच्या एका मंगल कार्यालयात हिंगनघाटच्या सीतेज मानकर यांच्याशी पार पडला, यात नीलिमा लाडिस्कर या नवरीने आपल्या माहेर वरून लग्नात पाच वृक्ष घेऊन ते वृक्ष आपल्या सासरी घेऊन गेली, हे पाचही वृक्ष ते आपल्या सासरच्या घरी व परिसरात लावणार असून यात दुष्काळ परिस्थितीत राज्य दुष्काळ मुक्त झाला पाहिजे अशी अपेक्षा तिने व्यक्त केली,
दिवसेंदिवस वृक्षांची तोड होत आहे, त्यामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ नये यासाठी झाडाची लागवड करणे आवश्यक आहे माझ्या लग्नातील पाहुण्यांना मी स्वतः पासून वृक्ष लागवड करून इतरांना झाडे लावण्यासाठी हा संदेश दिला
-असे मत निलिमा लाडिस्कर या नववधु ने व्यक्त केलेBody:अमरावतीConclusion:अमरावती

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.