अमरावती - प्रेम प्रकरणातून एका मुलीची हत्या करून मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी अमरावतीच्या धामणगाव रेल्वेत घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज (रविवारी) दर्यापूर तालुक्यातील लेहगाव येथे सुद्धा अशाच प्रकारे एका १९ वर्षीय तरुणाने तरुणीच्या घरात घुसून दिवसा ढवळ्या तिची चाकूने भोसकून हत्या केली आहे. यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रवीण कावनपुरे असे हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
सध्या त्याच्यावर दर्यापूर मधील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. आज (रविवारी) दुपारी युवतीच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधून आरोपी तरुणाने तिच्या घरात प्रवेश करून तरुणीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. स्वतः ला देखील संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत सुदैवाने तो वाचला आहे. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. या संदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - कोरोनातील एका लग्नाची गोष्ट; गरजूंना मदत करण्याचा निर्धार करुन केले कन्यादान...!