ETV Bharat / state

कधी वाघ आला नाही, अस्वलाचीही भीती वाटली नाही; मेळघाटच्या जंगलात बकऱ्या चारणाऱ्या दृष्टिहीन दांपत्याची खास कहाणी - घटांग

Blind Couple Grazed their Goats in Forest Area of Melghat : मेळघाटातील जंगलात एक दृष्टिहीन दांपत्य दिवसभर बकऱ्या चारतात. गेल्या दहा-पंधरा वर्षात कधी वाघही आला नाही आणि कधी अस्वलाचीही भीती वाटली नाही, असं या दांपत्यानं ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलंय.

Blind Couple Grazed their Goats in Forest Area of Melghat

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 3:02 PM IST

मेळघाटात बकऱ्या चारणारं अंध दांपत्य

अमरावती Blind Couple Grazed their Goats in Forest Area of Melghat : मेळघाटातील बिहालीपासून घटांग या गावाकडे जाणाऱ्या मार्गावर अर्धा तास जरी निवांत थांबलो किंवा या मार्गावर पायी चालण्याचा प्रयत्न जरी केला तरी काही वेळानं जंगलांनी वेढलेल्या या शांत मार्गावर निश्चितच भीती वाटायला लागते. मात्र, याच मार्गालगतच्या जंगलात एक दृष्टिहीन दांपत्य दिवसभर आपल्या बकऱ्या गवत, पाला चारायला आणतं. या दहा-पंधरा वर्षात कधी वाघही आला नाही आणि कधी अस्वलाचीही भीती वाटली नाही, असं सांगणाऱ्या या अंध दांपत्यांची धाडसी कहाणी 'ईटीव्ही भारत' नं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आयुष्यातील चढ-उताराचा सामना करणारं हे दांपत्य कठीण परिस्थितीशी झगडत बकऱ्यांद्वारे आपला उदरनिर्वाह करीत कुटुंबालाही आधार देण्याचा प्रयत्न करत आहे.

भोला, रुक्मिणीचा असा आहे संसार : चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या बिहाली या गावातील रहिवासी असणारे भोला मावसकर हे जन्मतः दृष्टीहीन आहेत. भोला मावसकर यांना प्रशांत आणि राम किशोर या दोन भावांसह एक बहीण होती. गणेश मावसकर या भावाचा कुटुंबाला मोठा आधार होता. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांची पत्नी घर सोडून निघून गेली. मात्र, त्याचा मुलगा गणेशचा सांभाळ भोला मावसकर हे करत आहेत. बहिणीचं देखील निधन झालं. यानंतर घरात असणारा लहान भाऊ राम किशोर मावसकर हा रोजगारानिमित्त पुण्यात आहे. आता घरी वडील चंदन मावसकर आणि आई जाऊ मावसकर सोबत राहतात. भोला मावसकर यांचं 2002 मध्ये रुक्मिणी यांच्यासोबत लग्न झालं. रुक्मिणी यादेखील जन्मतः दृष्टीहीन आहेत. लग्नानंतर भोला मावसकर यांनी काही बकऱ्या घेतल्या. या बकऱ्या हे दांपत्य सतत बिहाली परिसरातील जंगल भागात रोज चरायला नेतात. पत्नी रुक्मिणीला हिंदी आणि मराठी भाषा कळत नाही, ती केवळ कोरकू भाषाच समजू शकते. आम्हाला बाळ झालं नाही. आता माय, बाप दोन्हीही नसणारा पुतण्याच आमचा मुलगा आहे, असे भोला मावसकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

रस्त्याच्या काठानेच चारतात बकऱ्या : बकऱ्या चारण्यासाठी गावापासून आम्ही दूर येत असलो तरी शक्यतोवर घनदाट जंगलात आम्ही जात नाही. रस्त्याच्या काठानेच बकऱ्या चारतो आणि रस्त्याच्या काठानेच जाणं येणं करीत असल्यामुळं आम्हाला कधी कुठली अडचण जाणवली नाही, किंवा कुठल्या वन्य प्राण्यांशी सामना झाला नाही. गावातील अनेकांना या परिसरात वाघ दिसला अनेकांना अस्वलं दिसली. आम्हाला अनेकांनी सावध राहण्याच्या सूचना केल्यात. मात्र कुठलेही वन्यप्राणी आजपर्यंत तरी आमच्यासमोर आले नाहीत, असं भोला मावसकर यांनी सांगितलं. बकऱ्यांच्या गळ्यात बांधलेल्या घंटीमुळं आम्हाला आमची बकरी कुठं आहे हे कळतं. दिवसभर बकऱ्या चारल्यावर सायंकाळी आम्ही आमच्या बकऱ्या अगदी व्यवस्थित घरी नेतो असं देखील भोला मावसकर म्हणाले.

आमदार बच्चू कडू यांनी केली होती मदत : अगदी सुरुवातीला आमच्याकडं 12-13 बकऱ्या होत्या. गरजेनुसार आम्ही बकऱ्या विकल्या. मध्यंतरी काही बकऱ्या या आजारामुळं दगावल्या तर काहींना कुत्रं चावल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. आमच्या बकऱ्या दगावल्यामुळं एकदा आमदार बच्चू कडू यांनी आम्हाला आठ हजार रुपये दिले होते. त्या रकमेतून आम्ही तीन-तीन हजारांच्या दोन बकऱ्या विकत घेतल्या होत्या. मात्र, त्या दोन्ही बकऱ्या आमच्या हरवल्या. आता दोनच बकऱ्या आमच्याकडे शिल्लक असल्याचं भोला मावसकर म्हणाले.

झाडावर चढण्यात पटाईत : दृष्टी नसतानाही जंगलात बकऱ्या चारणारे दांपत्य अशी ओळख असणारे भोला मावसकर आणि रुक्मिणी मावसकर यांच्या संदर्भात गावातील प्रत्येकजण आदरानेच माहिती सांगतो. भोला मावसकर हे दृष्टीहीन असले तरी ते कोणत्याही झाडावर चढण्यात पटाईत असल्याची माहिती बिहाली येथील रहिवासी अंकित धांडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. जंगलात बकऱ्या चारणारं हे दांपत्य केवळ आमच्या गावातच नव्हे तर लगतच्या गावातील सर्वांच्याच परिचयाचं असल्याचंही अंकित धांडे म्हणाले.

हेही वाचा :

  1. Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या नावावर बच्चू कडूंनी लाटली लाखोंची रक्कम; भाजपाचा गंभीर आरोप
  2. Tribal House in Melghat : जाणून घ्या एकाही घरात 'देव्हारा' नसलेल्या गावाची कहाणी.....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.