ETV Bharat / state

शरद पवार यांना जीवे मारण्‍याची धमकी देणारा, अमरावतीतील भाजपचा कार्यकर्ता सौरभ पिंपळकर - भाजपच्या नेत्यांसोबत फोटो

शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देणारा हा अमरावतीतील भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या तरूणाने ट्विटरवरुन पवारांना धमकी दिली आहे. तेव्हापासून सौरभ पिंपळकरचा पोलीस तपास करुन शोध घेत आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jun 9, 2023, 10:28 PM IST

अमरावती - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्‍यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांना धमकी देणारा हा अमरावतीतील भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या तरूणाने ट्विटरवरुन पवारांना धमकी दिली आहे. तेव्हापासून सौरभ पिंपळकरचा पोलीस तपास शोध घेत आहेत.

तक्रार नाही पण पोलीस घेत आहेत शोध : शहरातील साईनगर भागात राहणारा २६ वर्षीय सौरभ हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्‍याच्‍या टि्वटर अकाऊंटवर त्‍याने 'आय ऍम बीजेपी ऍक्टिव्हिस्‍ट, आय हेट सेक्‍यूलेरिझम' असे लिहून ठेवले आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सौरभ पिंपळकरच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गाडगेनगर पोलिसांचे पथक त्‍याच्‍या शोधात आहे. हे पथक त्‍याच्‍या घरीही जाऊन आले, पण तो आढळून आला नाही. त्‍याचा मोबाईल देखील बंद आहे. या प्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत. अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस आयुक्‍तांनी दिली आहे.

भाजपच्या नेत्यांसोबत फोटो, कॉपी प्रकरणात आरोपी - सौरभ पिंपळकरचे उत्तर प्रदेशाचे मुखमंत्री योगी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, यांच्यासोबतचे काही फोटो आता समाज माध्‍यमावर प्रसारीत होऊ लागले आहेत. येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्‍थेतील कॉपी प्रकरणात भाजपचा माजी नगरसेवक प्रणीत सोनी याच्‍यासह सौरभ हा सहआरोपी असल्‍याची माहिती समोर आली आहे.

सौरभ पिंपळकरला तत्‍काळ अटक करा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्‍यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. शरद पवार यांना धमकीचे ट्विट करणारा अमरावतीतील भाजपचा कार्यकर्ता सौरभ पिंपळकर याला तत्‍काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची शुक्रवारी भेट घेऊन निवेदन सादर केले.

हेही वाचा ..

  1. Sharad Pawar : जिवे मारण्याच्या धमकीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
  2. Sharad Pawar Threat Case: शरद पवारांना धमकी देणाऱ्यास अटक करून मास्टरमाईंड शोधा - अजित पवार
  3. Sharad Pawar death threat : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी...काही घडले तर गृहमंत्रालय जबाबदार-सुप्रिया सुळे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.