अमरावती : समाजा समाजामध्ये भांडण लावण्याचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केले आहे. स्वातंत्र्यांनंतर सर्वाधिक काळ सत्ता काँग्रेसने उपभोगली. भाजपा सत्तेत आल्यास मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवतील, असा द्वेष समाजामध्ये पसरवला असे विधान त्यांनी यावेळी केले. एवढेच नव्हे तर भारतीय जनता पक्षासत्ता सत्य झाल्यास भारताची राज्यघटना बदलतील असा खोडसाळ प्रचार काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी केला. नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षाच्या काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी विसंगत विचार केव्हाही व्यक्त केले नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आल्याबरोबर त्यांनी धर्मांतर विरोधी कायदा रद्द केला. आता तर गोहत्या विरोधी कायदा सुद्धा रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
औरंगजेबांचे फोटो डोक्यावर घेऊन नाचणाऱ्यांचे मात्र खपवून घेतले जाणार नाही. पाकिस्तान जिंकल्यानंतर भारतात उत्सव साजरा करत असतील, हे मात्र या देशात चालणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे
नाना पटोलेंवर टीका : काँग्रेसमधून नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेले नागपूरचे आशिष देशमुख यांनी बोलताना सांगितले की, नरेंद्र मोदी यांचे कार्य जगव्यापी आहे. त्यांनी केलेल्या कार्यामुळेच आज संपूर्ण जगात त्यांची नोंद घेतली जात आहे. भाजपाच्या माध्यमातून विकासाची गंगा घरोघर पोहोचली आहे. भाजपाला मुख्य प्रवाहात जोडण्याचे काम करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित जनसभेत दिले. नाना पटोले यांच्यावर टीका करत त्यांनी चुल्लु भर पाण्यात डुबावे, अशी उपरोधिक टीका पटोले यांच्यावर केली.
एकही भ्रष्टाचार नाही : खासदार अनिल बोंडे बोलताना म्हणाले की, भारत मातेची प्रतिष्ठा जगभरात उंचावण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहे. मोदी हे बॉस आहे, असे विधान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान करतात. यावरून जगामध्ये नरेंद्र मोदी त्यांची लोकप्रियता किती आहे? याचा आपल्याला अंदाज आला असेल. भाजपच्या नववर्षाच्या कार्यक्रमांमध्ये एकही भ्रष्टाचार झाला नाही, सुशासन आणि गरीब कल्याण यावर भाजपाने आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भर दिला आहे.
देशाचे भाग्य उजाडले : प्रवीण दरेकर बोलताना म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत उभे राहण्याची ताकद भाजपामध्ये आहे. फडवणीस, मोदी बावनकुळे यांच्यावर काही नेते टीका करतात. पण तुम्ही टीका करणे योग्य नाही. एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदावर विराजमान करण्याचे काम भाजपाने केले आहे. 2014 मध्ये मोदी सत्तेत आले आणि देशाचे भाग्य उजाडले. समाजाचे प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न झाला, गरिबांची कल्याण सरकारने केली विदर्भात विकासाची गंगा वाहत असल्याची माहिती सुद्धा यावेळी त्यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर प्रवीण पोटे पाटील, किरण पातूरकर, प्रताप अडसड, जयंत डेहनकर निवेदिता दिघडे , शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय, आशिष देशमुख, चेतन पवार, जगदीश गुप्ता त्यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी तथा लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :