ETV Bharat / state

The Kerala Story: युवतींसाठी द केरळ स्टोरी सिनेमा शोचे भाजपच्यावतीने मोफत आयोजन; अमरावतीकरांनी दिला भरभरून प्रतिसाद

सध्या चर्चेत असणाऱ्या द केरळ स्टोरी या चित्रपटाला अमरावतीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी अमरावती शहरातील युवती आणि महिलांसाठी हा शो मोफत आयोजित केला. पुढच्या आठवड्यात शहरातील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या युवतींसाठी या सिनेमाचे दोन शो देखील भाजपच्यावतीने मोफत दाखविले जाणार आहे.

The Kerala Story
दि केरळ स्टोरी सिनेमा
author img

By

Published : May 7, 2023, 7:11 PM IST

श्रीमंतांनी किमान 25 जणांना हा सिनेमा दाखवावा- शिवराय कुलकर्णी

अमरावती : मागील काही दिवसांपासून 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. तो चित्रपट करमुक्त करावा, यासाठी मागणी देखील करण्यात आली होती. अमरावतीत भाजपने या चित्रपटाचे मोफत आयोजन केले होते. हा चित्रपट पाहण्यासाठी रविवारी थेट मेळघाटातूनही 25 ते 30 युवती आणि महिला खास अमरावतीत आल्या होत्या. मेळघाटात लव जिहादचे प्रमाण गतकाही वर्षात वाढले आहे. मेघाटातील युवतींमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी मेळघाटातील युवतींना हा चित्रपट दाखवणे अत्यंत आवश्यक असल्याचे भाजपच्या धारणी येथील पदाधिकारी क्षमा चौकसे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

जागृती होणे गरजेचे : राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्ह्यात वर्षभरात बऱ्याच लव जिहाहाच्या घटना समोर आल्या. आता दोन दिवसापूर्वी वरुड येथे भाजप कार्यकर्त्यांनी भंगार विकणाऱ्या मुस्लिम युवकासोबत पळून गेलेल्या युवतीला घरी परत आणले. तिची आम्ही समजूत घातली. चार महिन्यापूर्वी धारणीतून थेट हैदराबादला पळून नेलेल्या युवतीची आम्ही सुटका केली. महाराष्ट्रातील युवतींना केरळमधील युतीप्रमाणे थेट इसीसमध्ये भरती केले जात नसले, तरी त्यांचे भविष्य नरकापेक्षा वेगळे नाही. त्यामुळे युवतींसह पालकांमध्ये जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे मोफत आयोजन केल्याबद्दल त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो, असे देखील खासदार डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले.

श्रीमंतांनी किमान 25 जणांना दाखवावा सिनेमा : मी स्वत: मागील काही वर्षात 70 ते 80 लव जिहादच्या घटनांवर काम केले आहे. हे काम करत असताना मुलींचे ब्रेन स्टॉर्मिंग कसे केले जाते, या प्रश्नाचे उत्तर या चित्रपटातून मिळाले. समाजातील गरिबांजवळ हा सिनेमा पाहण्यासाठी पैसे नसतील तर ज्यांच्याकडे पैसे आहे, अशा श्रीमंतांनी किमान 25 जणांना हा सिनेमा दाखवावा, असे भाजपचे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी म्हटले आहे. हा सिनेमा सगळ्यांना दाखवणे आणि सगळ्यांनी पाहणे हे एक राष्ट्रीय कार्य असल्याचे देखील शिवराय कुलकर्णी म्हणाले.

हेही वाचा : Kerala Story release in Kerala : केरळमध्ये पोलीस बंदोबस्तात द केरळ स्टोरीचे प्रदर्शन सुरू
हेही वाचा : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरुन राजकारण तापले
हेही वाचा : The Kerala Story in Kochi : कोचीमध्ये 'द केरळ स्टोरी'चे शो रद्द, फक्त एकाच चित्रपटगृहात सिनेमा रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.